कितने आदमी थे! 'गब्बर'च्या भूमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्याला होती ऑफर, जावेद अख्तर यांची होती इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 04:41 PM2023-05-12T16:41:55+5:302023-05-12T16:42:35+5:30
सिनेमात प्रत्येक पात्राचं एक वेगळं महत्व आहे.
अरे ओ सांबा, कितने आदमी थे! होली कब है, कब है होली! या डायलॉगवरुन 'शोले'चा (Sholay) गब्बर सिंह डोळ्यासमोर आला असेल. अमजद खानने (Amjad Khan) गब्बरची भूमिका उत्तम निभावली होती. आजही त्यांचे डायलॉग लोकांच्या तोंडावर असतात. पण प्रत्यक्षात गब्बर सिंहच्या भूमिकेसाठी अमजद खान नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्याला विचारणा झाली होती.
हिंदी सिनेमातील लोकप्रिय लेखक जोडी सलीम जावेदने फिल्म 'शोले' ची कथा लिहिली होती. हा सिनेमा बनवण्यासाठी बराच काळ लागला होता. याचं मुख्य कारण होतं फिल्मची स्टारकास्ट निवडण्यात लागलेला वेळ. कारण सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की यातील प्रत्येक पात्राचं एक वेगळं महत्व आहे. विशेषत: गब्बरच्या भूमिकेचं.
माध्यम रिपोर्टनुसार, गब्बर सिंहची भूमिका आधी प्रसिद्ध अभिनेता डॅनी डेनजोंगपाला (Danny Denzongpa) ऑफर झाली होती. लेखक जावेद अख्तर यांची हीच इच्छा होती. मात्र काही कारणाने डॅनी यांनी भूमिका नाकारली आणइ अमजद खान यांच्याकडे तो रोल गेला. अमजद खान यांची उत्तम भूमिका साकारत गब्बर सिंहचा रोल ऐतिहासिक बनवला.
मल्टीस्टारर 'शोले' सिनेमात दिग्गज कालाकारांनी भूमिका साकारल्या. संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, सचिन पिळगांवकर, असरानी यांनी सिनेमा यादगार बनवला. यांच्यामुळेच 'शोले' सुपरहिट ठरला.