'मला दादा म्हणू नकोस', १४ वर्षांच्या मुलीवर जडलेला 'गब्बर'जीव, मुलीचे वडील म्हणाले- हे लग्न नाही होऊ शकत..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 11:10 AM2023-08-01T11:10:21+5:302023-08-01T11:18:57+5:30
अमजद खान या मुलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले होते. तिच्या वडिलांनी हा प्रस्ताव नाकारला. यामुळे अमजद प्रचंड संतापले होते.
जेव्हा कधी बॉलिवूडमधील कोणत्याही खलनायकाची चर्चा होते, तेव्हा 1975 मध्ये आलेल्या 'शोले' चित्रपटातील गब्बरचा उल्लेख आवर्जुन होतो. 'ये हाथ मुझे दे दे ठाकूर' आणि 'कितने आदमी द' सारखे यांसारख्या जबरदस्त संवादांमधून अमजद खान थेट 'शोले'चा गब्बर म्हणून लोकांच्या मनात घर करून गेले.आपल्या चित्रपटातील कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. पण आजही प्रेक्षकांना त्यांनी साकारलेला ‘गब्बर’ अतिशय आवडतो. ही भूमिका जणू त्यांच्यासाठीच बनली होती. त्यामुळेच ‘गब्बर’च्या भूमिकेत प्रेक्षक दुस-या कोणाचा विचारही करू शकत नाहीत. पडद्यावर अमजद खान यांनी अनेक निगेटीव्ह भूमिका साकारल्या. अमजद खान यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हती.
14 वर्षांच्या शेैहलाच्या प्रेमात पडले होते अमजद
शैहला खान व अमजद खान मुंबईत एकमेकांचे शेजारी होते. त्यावेळी अमजद बीएला होते आणि शेहला केवळ 14 वर्षांची शाळेत जाणारी मुलगी होती. याचदम्यान अमजद शेहलाच्या प्रेमात पडले होते. शैहला यांनी एका मुलाखतीत ही लव्हस्टोरी सांगितले होती.
शैहला व अमजद खान एकमेकांसोबत बॅडमिंटन खेळत. एका खेळता खेळता शेहलाने अमजद यांना भाई म्हटले. यावर मुझे भाई मत बोलो, असे अमजद शैहलाला म्हणाले होते. त्यानंतर काहीच दिवसांनी अमजद यांनी शैहलाला थेट लग्नासाठी प्रपोज केले होते. एकदिवस शैहला शाळेतून परतत असताना अमजद यांनी तिला मध्येच गाठले. तुला शेैहलाचा अर्थ ठाऊक आहे, असे त्यांनी तिला विचारले. शैहला म्हणजे, जिच्या डोळ्यांचा रंग गडद आहे. लवकर मोठी हो. कारण मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे ते तिला म्हणाले
अमजद शैहलाच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी शैहलाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. मात्र शैहला सध्या खूप लहान आहे, असे म्हणत तिच्या वडिलांनी हा प्रस्ताव नाकारला. यामुळे अमजद प्रचंड संतापले होते. यानंतर शैहलाच्या वडिलांनी तिला पुढच्या शिक्षणासाठी अलीगडला पाठवून दिले. आता शेैहला व अमजद खान एकमेकांपासून दुरावले होते. आता केवळ पत्र हेच त्यांच्यातील संवादाचे माध्यम होते. दोघेही एकमेकांना पत्र लिहित. बराच काळ हा सिलसिला सुरू राहिला. अनेक वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये राहिले आणि योग्यवेळ येताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अमजद खान यांचे आईवडिल पुन्हा एकदा मुलाचे स्थळ घेऊन शैहलाच्या घरी गेले. यावेळी शैहलाचे वडिल लग्नासाठी तयार झाले आणि 1972 साली हे कपल लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर वर्षभरात या जोडप्याच्या घरी शादाब हा मुलगा जन्मला. एकीकडे मुलाचा जन्म आणि दुसरीकडे ‘शोले’ची भूमिका असा दुहेरी आनंद अमजद यांच्या वाट्याला आला. ‘शोले’ रिलीज झाल्यानंतर अमजद यांचे अख्खे आयुष्यच बदलले.
अमजद यांचं 27 जुलै 1992 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अमजद यांना तीन मुले आहेत. पत्नी शेैहला मुलांसोबत राहते. शेैहला कधीच पतीचे सिनेमे पाहत नाहीत. त्यांचे सिनेमे मला अमजदची आठवण देतात, म्हणून मी ते पाहणे टाळते, असे शेैहला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.