घरी विरोध असल्याने फक्त मांसाहार करण्यासाठी 'शोले'मधील 'या' अभिनेत्याने घेतलेलं भाड्याने घर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 04:25 PM2024-09-25T16:25:52+5:302024-09-25T16:28:05+5:30
'शोले'मधील या अभिनेत्याने फक्त चिकन-मटण खाण्यासाठी घेतलेलं भाड्याने घर. कोण होता तो?
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे तसा भारताचा राष्ट्रीय सिनेमा म्हणजे 'शोले', हे शब्द माझे नाहीत तर कपिल शर्माचे आहेत. कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये 'शोले'चा उल्लेख करताना हे खास वर्णन केलं होतं. 'शोले'मधील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या लक्षात राहिली. जय, वीरु, गब्बर, ठाकूर, बसंती अशा अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. याच सिनेमातील एक अभिनेत्याने घरी मांसाहार खायला बंदी असल्याने फक्त त्यासाठी एक घर भाड्याने घेतलं होतं. हा अभिनेता म्हणजे 'शोले'मधील ठाकूर म्हणजेच अभिनेते संजीव कुमार.
मांसाहार खाण्यासाठी संजीव कुमार यांनी घेतलेलं भाड्याने घर
'शोले'मध्ये झळकलेले मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांनी कुणाल विजयकरला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. संजीव कुमार यांचा गुजराती ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला होता. पुढे सिनेमांमध्ये करिअर करण्यासाठी संजीव मुंबईत आले. संजीव कुमार चिकन-मटण खाण्याचे खूप शौकीन होते. परंतु त्यांच्या घरी मांसाहार खाण्यास बंदी होती. त्यामुळे संजीव कुमार यांनी पाली हिलमध्ये १ बीएचके फ्लॅट भाड्याने खरेदी केला होता.
48 Years of The Biggest Blockbuster of Indian Cinema
— Movie Reviews Blog (@MovieReviewsBlg) August 15, 2023
• Number 1 Film in Terms of Footfalls
• Record Gross for 19 Years
• 1st Film to celebrate Silver Jubilee at 100 Theatres
• 2nd Longest Theatrical Run for an Indian film of all time
• ALL TIME BLOCKBUSTER#Sholaypic.twitter.com/zxeBJwOQkf
हे कलाकार संजीव कुमार यांना द्यायचे कंपनी
संजीव कुमार या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांची हौस पुरी करायचे. यावेळी त्यांच्यासोबत अनेकदा शत्रुघ्न सिन्हा, शम्मी कपूर, रणधीर कपूर असायचे. रात्रभर ते चिकन-मटणवर ताव मारायचे. याशिवाय पाया सूप वगैरे आस्वाद घेऊन हे सर्व कलाकार मजा करायचे. पहाटे ५ पर्यंत खाण्याची ही दावत चालू असायची. संजीव कुमार हे खाण्याचे किती शौकीने होते याचे किस्से त्यांच्या काळातील अभिनेत्री मौसुमी चॅटर्जी सांगतात. अशाप्रकारे 'शोले'मधील 'ठाकूर' मांसाहार खाण्याची हौस पूर्ण करायचे.