VIDEO: चाहत्यांची गर्दी पाहून वरूण धवनला भरली धडकी, हात जोडत केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:33 IST2021-03-09T14:33:02+5:302021-03-09T14:33:45+5:30
कोरोना काळात चाहते विसरले भान; वरूण धवन म्हणाला, प्लीज शूट करू द्या

VIDEO: चाहत्यांची गर्दी पाहून वरूण धवनला भरली धडकी, हात जोडत केली विनंती
वरुण धवनला पाहण्यासाठी लोकांनी इतकी गर्दी केली की, या गर्दीला थोपवता थोपवता सेटवरच्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली. मग काय, बिचा-या वरूणलाच गाडीवर चढून चाहत्यांना हात जोडत विनंती करावी लागली. होय, वरूण धवन सध्या त्याच्या ‘भेडिया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अरुणाचल प्रदेशात या सिनेमाचे शूटींग सुरू आहे. पण सेटवर वरूणच्या चाहत्यांनी एकच गर्दी केलीय.
चित्रपटाच्या सेटवर इतकी गर्दी झाली की अखेर वरुणला त्याच्या गाडीवर चढून चाहत्यांना विनंती करावी लागली. वरुणने गाडीच्या छतावर चढून हात जोडून चाहत्यांना विनंती केली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्या नम्रपणाचं कौतुक केले आहे.
या व्हायरल व्हिडिओत वरुण धवन जमलेल्या गर्दीला शांत करताना दिसत आहे. ‘चित्रपटाचे शूटिंग अद्याप बाकी आहे, त्यामुळे मी आणखी काही दिवस इथेच आहे. म्हणून आता घाई करू नका आणि शूटींग पूर्ण होऊ द्या,’ असे वरूण या व्हिडीओत म्हणतात दिसतात. पण क्रेजी चाहते कुठे मानायचे. ते ते मोबाइल टॉर्च आॅन करून जोर जोरात ओरडताना दिसत आहेत.
‘भेडिया’ या सिनेमात वरूणसोबत क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहे. पुढील वर्षी 14 एप्रिलला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाच टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर खूपच रोमाचंक असून अनेक चाहत्यांनी याला पसंती दर्शवली होती. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.