श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 09:49 AM2024-11-30T09:49:00+5:302024-11-30T09:49:30+5:30

७ वर्षांपासून दोघंही सोबत दिसले नव्हते.

shraddha kapoor and arjun kapoor spotted at an award function meet on red carpet fans recalled Half Girlfriend | श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांनी 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमात एकत्र काम केलं होतं. २०१७ साली हा सिनेमा आला होता. चेतन भगत यांच्या पुस्तकावर सिनेमा आधारित होता. चाहत्यांना अर्जुन-श्रद्धाची केमिस्ट्री खूप आवडली होती. त्यानंतर श्रद्धा आणि अर्जुन पुन्हा एकत्र दिसले नाहीत. आता नुकतंच एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दोघंही समोरासमोर आले. त्यांना पाहून चाहत्यांना पुन्हा 'हाफ गर्लफ्रेंड'ची आठवण झाली.

'जीक्यू मेन ऑफ द इयर' अवॉर्ड सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक मंडळी हजर होती.यावेळी श्रद्धा कपूर हाय स्लीट ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली. तसंच तिने पांढऱे लाँग शूजही घातले होते. श्रद्धा या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. तर अर्जुन कपूरने ब्लॅक आऊटफिटमध्ये आला होता. रेड कार्पेटवर श्रद्धा पापाराझींसमोर पोज देत होती तेवढ्यात तिकडून अर्जुन कपूर आला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. काही वेळ गप्पाही मारल्या. त्यांना पाहून चाहत्यांना 'हाफ गर्लफ्रेंड' रिया आणि माधवच आठवले. 


अर्जुन आणि श्रद्धाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसावी अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. अर्जुनने नुकताच 'सिंघम अगेन' हा सुपरहिट सिनेमा दिला.  यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली ज्याचं खूप कौतुक झालं. तर श्रद्धाने नुकतंच 'स्त्री २' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. आता हे दोघंही खरंच कोणत्या सिनेमात एकत्र येतात का हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: shraddha kapoor and arjun kapoor spotted at an award function meet on red carpet fans recalled Half Girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.