श्रद्धा कपूर बनली चार चार मुलांची आई!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 10:16 AM2017-06-22T10:16:50+5:302017-06-22T15:46:50+5:30
श्रद्धा कपूर सध्या आई बनून प्रचंड आनंदी आहे. दचकलाच? आम्ही रिअल लाईफ नाही तर श्रद्धाच्या रिल लाईफबद्दल बोलतोय. होय, ...
श रद्धा कपूर सध्या आई बनून प्रचंड आनंदी आहे. दचकलाच? आम्ही रिअल लाईफ नाही तर श्रद्धाच्या रिल लाईफबद्दल बोलतोय. होय, ‘हसीना’ या तिच्या आगामी चित्रपटात श्रद्धा आई बनली आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना’ या बायोपिकमध्ये श्रद्धा लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा प्रथमच आई बनली आहे. ती सुद्धा एक नाही चार मुलांची. विशेष म्हणजे, या भूमिकेला श्रद्धाने पूर्ण न्यायही दिला. खरे तर इतक्या लहान वयाची कुठलीही हिरोईन चार चार मुलांची आॅनस्क्रीन आई बनण्यास नकार देईल. पण श्रद्धाने ही रिस्क घेतलीच.
दिग्दर्शक अपूर्व लाखिया म्हणूनच श्रद्धावर जाम खूश आहेत. त्यांनी तिची तोंडभरून स्तूती केली आहे. श्रद्धाबद्दल काय बोलू नि काय नको, असे त्यांना झालेय. त्यांनी सांगितले की, चार चार मुलांच्या आईची भूमिका साकारणे, तेही या वयात सोपा निर्णय नक्कीच नव्हता. पण श्रद्धाने यासाठी तयारी दाखवली. ती मुलांसोबत प्रचंड एकरूप झाली होती. इतकी की, ती इतक्या कमी वयाची आहे, हे मलाच खरे वाटेना. एका सीनमध्ये श्रद्धाला आपल्या या मुलांना शांत करायचे होते. श्रद्धाने हा सीन इतका उत्तम दिला की, मला तिचे प्रचंड कौतुक वाटले. चारही बालकलाकारांना मी चार तास आधीच सेटवर बोलवायचो. जेणेकरून त्यांची श्रद्धाशी चांगली बॉन्डिंग व्हावी. याशिवाय त्यांच्या खºया पालकांना सेटवर येण्यास मनाई केली गेली होती. श्रद्धाने या आईच्या भूमिकेसाठी बरीच तयारीही केली होती. तिने यासाठी प्रेग्नंसीची पुस्तके वाचलीत. आईपण नेमके कसे असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न तिने केला. या भूमिकेतील बारकावे तिने आत्मसात केले.
‘हसीना’हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर आधारित आहे.