श्रद्धा कपूरने खरेदी केली आलिशान लक्झरी Lexus कार, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 09:46 IST2025-03-29T09:45:32+5:302025-03-29T09:46:11+5:30
श्रद्धा कपूरने खरेदी केली आलिशान लक्झरी Lexus कार, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या (shraddha kapoor)

श्रद्धा कपूरने खरेदी केली आलिशान लक्झरी Lexus कार, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
श्रद्धा कपूरने (shraddha kapoor) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. श्रद्धा कपूरला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.श्रद्धा कपूरने ४ वर्ष बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने गाजवलं. श्रद्धाची भूमिका असलेला 'स्त्री २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपरहिट झाला.अशातच श्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे श्रद्धाने आलिशान लेक्सस गाडी खरेदी केलीय. या गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. जाणून घ्या श्रद्धाच्या नवीन गाडीविषयी
श्रद्धा कपूरने खरेदी केली नवी गाडी
श्रद्धा कपूरला गाड्यांचं किती वेड आहे हे तिच्या चाहत्यांना चांगलंच माहित आहे. श्रद्धा कपूरने नुकतीच अल्ट्रा लक्झरी कार Lexus LM 350h खरेदी केलीय. ही कार काळ्या रंगाची आहे. श्रद्धाच्या या कारची किंमत कोटींच्या घरात आहे. या गाडीची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही गाडी २.९३ कोटींची आहे. श्रद्धा कपूरने ही नवी कार घेताच चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंय. त्यामुळे श्रद्धाकडे जे गाड्यांचं कलेक्शन आहे, त्यामध्ये नवी कार समाविष्ट झालीय.
श्रद्धा कपूरच्या गाड्यांचं कलेक्शन
श्रद्धाकडे असलेल्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं तर, तिच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. तिच्याकडे लाल रंगाची Lamborghini Huracan Tecnica ही कार आहे. या कारची किंमत ४ कोटींच्या घरात आहे. २०२३ साली श्रद्धाने ही कार खरेदी केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये श्रद्धाने मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडी खरेदी केली. याशिवाय श्रद्धाकडे ऑडी ०७, मर्सिडीज बेंज GLA, BMW 7 सीरिज या गाड्या आहेत.