मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 04:18 PM2024-05-28T16:18:21+5:302024-05-28T16:19:29+5:30

श्रद्धाने मुंबईतल्या नवीनच झालेल्या कोस्टल रोडवरही ड्रायव्हिंगचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला.

Shraddha Kapoor Drives Lamborghini on Mumbai Coastal Road late night drive with a friend | मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'

मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'

अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) गेल्या वर्षी स्वत:लाच एक महागडं गिफ्ट दिलं. लँबॉर्गिनी (Lamborghini)   टेक्निका ही 4.04 कोटींची कार आलिशान कार तिने खरेदी केली.  श्रद्धा अनेकदा मुंबईत तिच्या या महागड्या कारमधून ड्राईव्हवर जाते. तिचा स्वॅग पाहून सर्वच थबकतात. आता नुकतंच श्रद्धाने मुंबईतल्या नवीनच झालेल्या कोस्टल रोडवरही ड्रायव्हिंगचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला.

श्रद्धा अनेकदा तिच्या नवीन लँबॉर्गिनी कारमधून रात्री उशिरा मुंबईत ड्रायव्हिंग करते. काल रात्री तिने मैत्रिणीसोबत डिनर पार्टी केली. नंतर लँबॉर्गिनी मधून घरी जात असतानाच तिने शहरात नवीनच झालेल्या कोस्टल रोडवरुन फेरफटका मारला. बाजूला बसलेल्या तिच्या मैत्रिणीने हा व्हिडिओ काढला. श्रद्धाने व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'लेट नाईट ड्राईव्हवरचं प्रेम आणखी वाढलंय..नवीन कोस्टल रोडने मन जिंकलं.' 

श्रद्धा कपूर या कोस्टल रोडच्या तर प्रेमातच पडली आहे. तसंच इतक्या आलिशान कारमधून कोणाला मजा येणार नाही अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मुंबईच्या कोस्टल रोडवरुन याआधी अमिताभ बच्चन यांनीही प्रवास केला. तेव्हा त्यांनीही याचं कौतुक केलं होतं. 

सध्या कोस्टल रोडचा फेज 1 खुला झाला आहे. मरीन लाईन्स ते वरळीला जोडणारा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. कोस्टल रोडची एकूण लांबी 29.2 किमी आहे. याच्या फेज 2 मध्ये वरळी थेट कांदिवलीला जोडली जाणार आहे. 

Web Title: Shraddha Kapoor Drives Lamborghini on Mumbai Coastal Road late night drive with a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.