श्रद्धाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री? राहुल मोदीसोबत ब्रेकअपनंतर बिझनेसमनसोबत अफेअरची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 04:31 PM2024-10-17T16:31:46+5:302024-10-17T16:32:05+5:30
श्रद्धा कपूर वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या 'स्त्री २' चं यश एन्जॉय करत आहे. सिनेमाने तब्बल ८५० कोटींचा व्यवसाय केला आहे. श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. आधी राहुल मोदीला डेट केल्यानंतर त्याच्यासोबत ब्रेकअपची चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी श्रद्धाने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. तर आता ती एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
Reddit या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट व्हायरल झाली. श्रद्धा कपूर राहुल मोदीला नाही तर एका सिंधी बिझनेसमनला डेट करत आहे अशी ती पोस्ट होती. या बिझनेसमनचा फिल्म इंडस्ट्रीशी काही संबंध नाही. त्याचे केवळ इंडस्ट्रीत शेअर आहेत. दिल्लीत स्त्री २ चं प्रमोशन करत असताना तो तिच्यासोबत होता अशीही चर्चा आहे. तसंच तो श्रद्धापेक्षा छोटा आहे अशीही चर्चा सोशल मीडियावर झाली.
Shradha kapoor is not dating rahul mody but some sindhi guy.
byu/Fuzzy_Tadpole_3117 inBollyBlindsNGossip
आगामी 'धूम 4' साठी श्रद्धा कपूरचं नाव चर्चेत आहे. रणबीर कपूरसोबत पुन्हा तिची जोडी दिसू शकते. दोघंही 'तू झुठी मै मक्कार' सिनेमात दिसले होते. 'स्त्री 2' च्या यशामुळे श्रद्धाची डिमांडही वाढली आहे. तसंच अफेअरच्या चर्चांमुळेही ती सतत प्रसिद्धीझोतात असते. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. कमेंट्समध्ये ती चाहत्यांना अनेकदा रिप्लायही देते.