सायना नेहवालच्या चित्रपटातून श्रद्धा कपूर आऊट दीपिका पादुकोण इन ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 11:53 AM2018-01-08T11:53:38+5:302018-01-08T17:25:25+5:30
2017 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसं लक्की ठरलं नाही. तिचे रिलीज झालेले 'ओके जानू' आणि 'हसीना पारकर' हे दोनही ...
2017 हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी फारसं लक्की ठरलं नाही. तिचे रिलीज झालेले 'ओके जानू' आणि 'हसीना पारकर' हे दोनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. त्यानंतर श्रद्धा तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये बिझी आहे. प्रभासच्या अपोझिट साहोमध्ये श्रद्धा झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल ही हैदराबादमध्ये पूर्ण झाले आहे. साहोनंतर श्रद्धा भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आधारित बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारणार होती. सायनाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी तिने ट्रेनिंग ही सुरु केली होती. गतवर्षी दोघींचे बॅडमिंटन खेळतानाचे कोर्टवरचे फोटो व्हायरल झाले होते. हैदराबाद इथल्या सायनच्या घरी जाऊन श्रद्धाने तिची भेट देखील घेतली होती. मात्र आता काही वेगळीच माहिती मिळते आहे सायनाच्या चित्रपटातून श्रद्धाला डच्चू दिल्याची चर्चा आहे. त्याचे कारण असू की सायनाची भूमिका साकारणासाठी श्रद्धा प्रशिक्षण घ्यायला इतका वेळ लागतो आहे की फेब्रुवारीमध्ये देखील चित्रपटाच्या शूटिंगचे काम सुरु होणे अवघड झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेत निर्मात्यांनी श्रद्धाच्या जागी दुसरी अभिनेत्री घेण्याचा विचार केला असल्याचे समजते आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडून प्रशिक्षण सुद्धा घेत होती. खेळाची पार्श्वभूमी नसल्याने पडद्यावर ही भूमिका साकारणं श्रद्धासाठी आव्हानात्मक होते. श्रद्धाच्या जागी या चित्रपटात दीपिका पादुकोणची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दीपिका शाळेलय जीवनात बॅडमिंटन खेळायची त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी तिला विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही आहे. त्यामुळे आता निर्माते नक्की या निर्णय घेतात हे लवकरच कळेल.
ALSO READ : श्रद्धा कपूरने ऐकला वडिलांचा सल्ला; एक्स बॉयफ्रेंडपासून दूर राहणे केले पसंत!!
श्रद्धाचा साहोमध्ये डबल रोल असल्याचे ही कळते आहे. हा चित्रपट हिंदी, तामीळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट १५० कोटी रुपये इतके आहे. श्रद्धाने यात काम करण्यासाठी १२ कोटींचे मानधन मागितले होते मात्र मेकर्सने तिला ९ कोटी रुपयांवर तडजोड करायला लावली.