श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर दिसला 'बॉयफ्रेंड'चा चेहरा, कोण आहे तो? पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:00 IST2025-01-13T17:59:17+5:302025-01-13T18:00:24+5:30
श्रद्धानं नेमका कुणाचा फोटो आपल्या वॉलपेपरवर लावला आहे? ही खास व्यक्ती कोण आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर याबद्दल जाणून घेऊया.

श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर दिसला 'बॉयफ्रेंड'चा चेहरा, कोण आहे तो? पाहा Video
Shraddha Kapoor Phone Wallpaper: मनोरंजनविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच चर्चेत असते. आपला अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतचं तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाईफइतकीच किंबहुना तिच्यापेक्षा जास्त चर्चा तिच्या पर्सनल लाईफची होते. अशातच आता श्रद्धा कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपरील फोटो पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. श्रद्धानं नेमका कुणाचा फोटो आपल्या वॉलपेपरवर लावला आहे? ही खास व्यक्ती कोण आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर याबद्दल जाणून घेऊया.
नुकतंच श्रद्धा कपूर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये श्रद्धाने गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं आहे. यावेळी तिच्या हातातील मोबाईल फोनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या मोबाईल फोनवर असलेल्या वॉलपेपरवर सर्वांच्या नजरा खिळल्या. श्रद्धाने रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबतचा (Rahul Mody) फोटो वॉलपेपरवर लावला आहे. यावरुन आता दोघे डेट करत असल्याचं कन्फर्म झालं आहे.
राहुल मोदी बॉलिवूड चित्रपटांचा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. राहुलने व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. तो 'तू झुठी में मक्कर' चित्रपटाचा लेखक आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भुमिकेत होती. याशिवाय त्याने 'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांसाठी स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केले आहे. तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटात श्रद्धाने राहुल मोदीसोबत काम केले होते. या चित्रपटादरम्यानच एकत्र काम करताना त्यांच्यात प्रेम फुललं अशी चर्चा आहे.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसली होती. या हॉरर कॉमेडी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. श्रद्धा कपूर ही 'आशिकी २' मध्ये दिसणार अशी चर्चा आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमात ती आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) सोबत काम करणार असल्याचं बोललं जात आहे. दिग्दर्शक मोहित सुरी या जोडीला स्क्रीनवर घेऊन येणार आहेत अशी चर्चा आहे. एका रोमँटिक सिनेमात त्यांची वर्णी लागली आहे. याआधी श्रद्धा आणि आदित्यने 'ओके जानू' हाही सिनेमा केला होता. दोघांच्या अफेअरची आणि नंतर ब्रेकअपची चर्चा झाली. यानंतर ते पुन्हा सोबत दिसले नाहीत. पण आता 'आशिकी २'चे दिग्दर्शक मोहित सुरीच दोघांना परत घेऊन येत आहेत.