श्रीदेवीनंतर श्रद्धा कपूर बनणार बॉलिवूडची नवीन इच्छाधारी नागीण, ३ पार्टमध्ये येणार सिनेमा!

By अमित इंगोले | Published: October 28, 2020 02:13 PM2020-10-28T14:13:10+5:302020-10-28T14:19:57+5:30

बॉलिवूडला श्रद्धा कपूरच्या रूपाने नवीन इच्छाधारी नागीन मिळणार आहे. कारण तिने तीन सिनेमांची सीरीज साइन केली आहे.

Shraddha Kapoor to play the role of Naagin in a trilogy | श्रीदेवीनंतर श्रद्धा कपूर बनणार बॉलिवूडची नवीन इच्छाधारी नागीण, ३ पार्टमध्ये येणार सिनेमा!

श्रीदेवीनंतर श्रद्धा कपूर बनणार बॉलिवूडची नवीन इच्छाधारी नागीण, ३ पार्टमध्ये येणार सिनेमा!

googlenewsNext

'स्त्री' आणि 'छिछोरे'मध्ये जबदरस्त परफॉर्मन्स देणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरबॉलिवूडमध्ये एक नवी भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा भारतीय लोककथेवर आधारित असेल. श्रद्धाने एक तीन सिनेमांची सीरीज साइन केली आहे. ज्यात ती एका इच्छाधारी नागीणीची भूमिका साकारणार आहे. फॅन्स आता श्रद्धा ग्लॅमरस नागीणच्या रूपात बघायला मिळणार आहे. 

श्रद्धा कपूर आधी बॉलिवूडमध्ये वैजयंतीमाला, रीना रॉय, रेखा आणि श्रीदेवी यांनी वेगवेगळ्या सिनेमांमध्ये नागीणची भूमिका साकारली आहे. श्रद्धा कपूरआधी श्रीदेवीने इच्छाधारी नागीणची भूमिका असणाऱ्या दोन सिनेमांची सीरीज 'नगीना' आणि 'निगाहें' मध्ये नागीणची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिका आजही पसंत केल्या जातात. अशात श्रद्धा कपूरसाठी श्रीदेवीसारखं परफेक्शन आणणं बरंच कठिण होणार आहे. 

या सीरीजबाबत श्रद्धा कपूर फारच उत्साही आहे. ती म्हणाली की, तिला सिनेमात नागीनी भूमिका साकारायला मिळणार असल्याने आनंदी आहे. कारण तिने बालपणापासून श्रीदेवीच्या नागीणच्या भूमिकेला पाहिलं आहे आणि अशी भूमिका तिला नेहमीच साकारायची इच्छा होती.

अजून या सिनेमाचं टायटल ठरलेलं नाही. पण सिनेमाच्या सीरीजचं दिग्दर्शन विशार फूरिया करणार आहे. त्यानेच २०१७ मध्ये 'लपाछपी' हा लोकप्रिय सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमांची निर्मिती निखील द्विवेदी करणार आहे. आणि यात लव्हस्टोरी अॅंगलही असणार आहे. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, श्रद्धाच्या या सिनेमात तिचा हिरो कोण असेल.
 

Web Title: Shraddha Kapoor to play the role of Naagin in a trilogy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.