रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 08:11 PM2019-01-23T20:11:40+5:302019-01-23T20:23:43+5:30

श्रद्धा कपूर आपल्याला  'एबीसीडी 2' मध्ये दिसली होती. त्यानंतर ती या सिनेमाच्या पुढच्या सीझनमध्ये सुद्धा वर्णी लागली आहे.

shraddha kapoor playing pakistani dancer role in remo d'souza film | रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर

रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर

googlenewsNext
ठळक मुद्दे श्रद्धा कपूरने रुपेरी पडद्यावर केलेल्या डान्ससाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहेया सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहे.

श्रद्धा कपूर आपल्याला  'एबीसीडी 2' मध्ये दिसली होती.  त्यानंतर ती या सिनेमाच्या पुढच्या सीझनमध्ये सुद्धा वर्णी लागली आहे. यात ती पहिल्यांदा पाकिस्तानी मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. याआधी श्रद्धाने हैदरमध्ये कश्मिरी मुलीची भूमिका साकारली होती. मात्र पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारण्याची तिची पहिलीच वेळ आहे. श्रद्धा कपूरने रुपेरी पडद्यावर केलेल्या डान्ससाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहे.सुन साथिया, छम छम, हाय रेटेड गबरू हे श्रद्धाची गाजलेली गाणी आहेत. तिने या गाण्यावर केलेला डान्स प्रेक्षकांना खूप भावला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे मन डान्समधून जिंकण्यासाठी ती कठोर परीश्रम करत आहे. 


या सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहे. या सिनेमात वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा लीड रोलमध्ये आहेत. सिनेमात श्रद्धा भारतीय डान्सरची भूमिका साकारणार आहे तर नोरा इंटरनॅशनल डान्सरच्या भूमिकेत दिसेल. सिनेमात प्रभु देवा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

हा सिनेमा‘एबीसीडी3’ म्हणजेच रेमोच्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा भाग असल्याचे मानले जात आहे. या सीरिजमधील साआधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते.  बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.रेमोच्या या डान्स मुव्हीत आणखी काय काय एक्ससाईटींग पाहायला मिळते, ते बघूच. श्रद्धा याशिवाय साहो', 'छिछोर', सायना नेहवाल बायोपिकमध्ये दिसणार आहे. 

Web Title: shraddha kapoor playing pakistani dancer role in remo d'souza film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.