Stree 2 Teaser: ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:04 PM2024-06-25T12:04:25+5:302024-06-25T12:05:34+5:30

ओ स्त्री! चंदेरी गावात पुन्हा 'ती'ची दहशत

Shraddha Kapoor Rajkuamar Rao starrer Stree 2 Teaser out movie releasing on Independence Day | Stree 2 Teaser: ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का?

Stree 2 Teaser: ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का?

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा 'स्त्री' सिनेमा सुपरहिट झाला होता. 2018 साली आलेल्या हा सिनेमा हिंदी हॉरर सिनेमातील वेगळा प्रयोग होता. हॉरर सिनेमाला कॉमेडीचाही तडका देण्यात आला होता. आता प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे ती 'स्त्री 2' (Stree 2) ची. नुकताच 'स्त्री 2' चा टीझर आला आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी यांची झलक सिनेमात दिसत आहे. तर शेवटी 'स्त्री'चीही झलक दिसते.

'स्त्री 2'मध्ये 'ती' परत आली असून संपूर्ण चंदेरी गाव पुन्हा दहशतीखाली असणार आहे. सुरुवातीला 'स्त्री'चा पुतळा दिसतो. ज्यावर 'ओ स्त्री रक्षा करना' असं लिहिलेलं आहे. तर यावेळी श्रद्धा कपूर लांब वेणीत दिसत आहे. पहिल्या पार्टमध्ये श्रद्धा स्त्रीची कापलेली वेणी लावते असा शेवट करण्यात आला होता. आता सीक्वेलमध्ये श्रद्धाच 'स्त्री' असणार का हे पाहण्यात मजा येणार आहे. दुसरीकडे राजकुमार राव आणि त्याचे मित्र पुन्हा 'स्त्री'पासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात दिसणार आहेत. तसंच राजकुमार आणि श्रद्धाची गोड लव्हस्टोरीही पाहायला मिळणार आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

'स्त्री 2' 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'स्त्री'च्या पहिल्या भागातील VFX ही कमाल होते. आता या भागातही VFX वर जास्त काम करण्यात आलं आहे. 2018 साली 'स्त्री'ने २५ कोटींची कमाई केली होती. तर सिनेमाचं बजेट 14 कोटी होतं. आता 'स्त्री 2'ची कमाई दुप्पट होण्याचा अंदाज आहे. तसंच यामध्ये प्रेक्षकांसाठी खास सरप्राईजही असणार आहे.

Web Title: Shraddha Kapoor Rajkuamar Rao starrer Stree 2 Teaser out movie releasing on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.