मराठमोळ्या श्रद्धाच्या 'स्त्री २'नं बॉक्स ऑफिस झपाटलं, कमावले तब्बल 'इतके' कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:04 PM2024-08-19T13:04:39+5:302024-08-19T13:31:56+5:30

श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ने किती कमाई केली?

shraddha kapoor rajkummar rao film Stree 2 box office worldwide collection 283 crore | मराठमोळ्या श्रद्धाच्या 'स्त्री २'नं बॉक्स ऑफिस झपाटलं, कमावले तब्बल 'इतके' कोटी!

मराठमोळ्या श्रद्धाच्या 'स्त्री २'नं बॉक्स ऑफिस झपाटलं, कमावले तब्बल 'इतके' कोटी!

'स्त्री २' हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाने पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली आहे.  मराठमोळी श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) , पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी तसंच तमन्ना भाटिया अशी कलाकारांची मोठी फौज असलेला सिनेमा पहिल्या दिवशी किती कमाई करेल, याची उत्सुकता सर्वांना होती. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार,'स्त्री २' ने चांगली कमाई केली आहे. 

'स्त्री २' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वांनाच आश्चर्यचकित करते आहे.  या सिनेमाने २०० कोटींचा टप्पा पार केला असून आता ३०० कोटींच्या क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री घेऊ शकतो. प्रॉडक्शन हाऊस मॅडॉक फिल्म्सने 'स्त्री 2' चे ओपनिंग वीकेंड कलेक्शन शेअर केले आहे. त्यानुसार या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 283 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पोस्ट शेअर करत  मॅडॉक फिल्म्सने लिहिलं, 'बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडणारी ही जुगलबंदी! हे शक्य केल्याबद्दल दर्शकांचे आभार'. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही हात जोडून चाहत्यांचे आभार मानले आहेत.


'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या' या सिनेमांनंतर 'स्त्री २' या युनिव्हर्समधील पुढचा सिनेमा आहे. 'स्त्री' या चित्रपटाने 2018 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता सहा वर्षांनंतर याच चित्रपटाच्या 'स्त्री 2' सीक्वेलनेही बॉक्स ऑफिसवरील जलवा कायम ठेवला आहे.
'स्त्री २' ची विशेष बाब म्हणजे यात वरुण धवन आणि अक्षय कुमार यांचा खास कॅमिओ आहे. 'स्त्री २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: shraddha kapoor rajkummar rao film Stree 2 box office worldwide collection 283 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.