कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर राहणार भाड्याच्या घरात, लाखात आहे महिन्याचा RENT
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:56 PM2024-12-03T13:56:04+5:302024-12-03T13:56:45+5:30
कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर भाड्याच्या घरात राहणार आहे.
बॉलिवूडची 'ब्लॉकबस्टर स्त्री' श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चाहत्यांची लाडकी आहे. मराठमोळ्या श्रद्धाला फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करुन 14 वर्ष झाली आहेत. यात तिने अनेक हिट सिनेमे दिले. काही फ्लॉपही झाले. श्रद्धाने नुकतंच 'स्त्री 2' हा ब्लॉकबस्टर हिट दिला. या सिनेमानं कोट्यावधींची कमाई केली. या सिनेमानं तिच्या करिअरचा आलेख तर उंचावलाच पण मोठा चाहता वर्गही निर्माण झाला आहे. कोट्यवधी कमावूनही श्रद्धा कपूर भाड्याच्या घरात राहात आहे.
'स्त्री 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूरनं मुंबईच्या जुहू परिसरात एक अपार्टमेंट वर्षभरासाठी भाडेतत्वावर घेतला आहे. या अपार्टमेंटचं भाडं हे काही 1-2 लाख नाही तर तब्बल 6 लाख प्रतिमहा आहे. श्रद्धाचा हा अपार्टमेंट 3928.86 स्क्वेअर फुटांचा आहे. प्रॉपर्टी डॉक्यूमेंटेशन फर्म Zapkey नं दिलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटसाठी श्रद्धानं 72 लाख रुपये आधीच देऊ केले आहेत. या अपार्टमेंटमध्ये चार कार पार्किंगची जागा आहे. मुंबईत आई-वडिलांचं घर सोडून श्रद्धा कपूर भाड्याच्या घरात का शिफ्ट होत आहे, याचं कारण सध्या समोर आलेलं नाही.
श्रद्धा ही शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी आहे. वडील शक्ती कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रद्धानेही बॉलिवूडची वाट धरली. २०१० साली श्रद्धाने 'तीन पत्ती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, 2013साली आलेल्या 'आशिकी 2'ने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केल्यानंतर आणि काही फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर श्रद्धाचा 'स्त्री' हा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रचंड गाजला. 'स्त्री'नंतर आता श्रद्धा नागिण बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.