"लग्न कधी करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं हटके उत्तर, म्हणाली, "शेजारच्या काकू..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:08 PM2023-10-04T15:08:11+5:302023-10-04T15:09:36+5:30
चाहत्याच्या प्रश्नाला श्रद्धा कपूरने हटके रिप्लाय दिला आहे. तिच्या या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१३ साली श्रद्धाने 'आशिकी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. स्टार किड असलेल्या श्रद्धाने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
नवीन प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर करत श्रद्धा तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. नुकतंच श्रद्धाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धाचा साधा लूक पाहायला मिळत आहे. श्रद्धाने सोफ्यावर बसून फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. या फोटोला तिने "मोठं डोकं = मोठा मेंदू" असं कॅप्शन दिलं आहे. श्रद्धाच्या या साध्या लूकमधील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अनुष्काच्या प्रेगन्सीच्या चर्चांदरम्यान विराट कोहलीची पोस्ट; अभिनेत्री म्हणाली, "मला कोणीही..."
श्रद्धाने शेअर केलेल्या या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट करत तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला आहे. "लग्न कधी करणार?" असा प्रश्न चाहत्याने विचारला आहे. चाहत्याच्या या प्रश्नाला श्रद्धाने अगदी हटके रिप्लाय दिला आहे. "शेजारच्या काकू तुम्ही खऱ्या आयडीवरुन कमेंट करा", असं उत्तर श्रद्धाने दिलं आहे. तिचा हा रिप्लाय पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे.
'आशिकी २'नंतर श्रद्धा 'बाघी', 'एक व्हिलन', 'हाफ गर्लफ्रेंड', 'ओके जानू', 'छिछोरे', 'एबीसीडी २' या सुपरहिट चित्रपटांत झळकली. 'स्त्री' या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'तू झुठी मै मक्कार' चित्रपटात श्रद्धाने रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती.