तेच डोळे, तजेलदार त्वचा; युनिफॉर्मवर दिसलं 'लव्ह साहू'! श्रद्धा कपूरचा शाळेतील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:59 IST2025-03-25T09:57:50+5:302025-03-25T09:59:08+5:30
श्रद्धाचा शाळेतील फोटो पाहून तिच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे.

तेच डोळे, तजेलदार त्वचा; युनिफॉर्मवर दिसलं 'लव्ह साहू'! श्रद्धा कपूरचा शाळेतील फोटो व्हायरल
बॉलिवूडची ब्लॉकबस्टर 'स्त्री' श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. विराट कोहलीनंतर श्रद्धाचेच इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.९४ मिलियन एवढा तिच्या फॉलोअर्सचा आकडा आहे. तसंच ती कमेंट्समध्ये चाहत्यांना उत्तरंही देते. त्यामुळे ती चाहत्यांच्या अगदी जवळची अभिनेत्री आहे. श्रद्धाचे फोटो आणि कॅप्शन खूप हटके असतात. आता नुकतंच श्रद्धाचा शाळेतला फोटो व्हायरल झाला आहे. यावरही चाहत्यांच्या तुफान कमेंट्स आल्या असून फोटो खूप व्हायरल होतोय.
शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरचा शाळेतला फोटो पाहून तिच्यात काही फरक दिसत नाही अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. हा फोटो तिच्या शाळेच्या फेअरवेलचा आहे. शेवटच्या दिवशी सर्न वर्गमित्रांनी युनिफॉर्मवर पेनाने काही ना काही लिहिले आहे. 'मिस मी, लव्ह साहू', 'लव्ह यू', 'जान्या' असं बरंच काही लिहिलं आहे. तिच्या चेहऱ्यावरही पेनाने रेघोटे ओढल्याचं दिसतंय. श्रद्धाचा हसतच पोज देत आहे. तेच घारे डोळ, सरळ केस, गोरा चेहरा असाच तिचा लूक आहे. श्रद्धामध्ये काहीच बदल झालेला नाही आजही ती तशीच दिसते असंच चाहते म्हणत आहेत.
Unseen Photo of Shraddha Kapoor from her School Days
byu/Dismal-Complaint5444 inBollyBlindsNGossip
'श्रद्धाची स्किन आजही अशीच आहे', 'ती तेव्हापासूनच सुंदर दिसते', 'काहीच फरक नाही, सुंदर स्त्री' अशा कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत. श्रद्धाचा शाळेतील फोटो पाहून तिच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे.
श्रद्धा कपूरचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. नंतर ती परदेशातही शिकायला होती. श्रद्धाला अनेक फॉरेन भाषेतील उच्चार जशास तसे जमतात. ती तिची खासियतच आहे. नुकताच तिने 'स्त्री २' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. १५ वर्षांपूर्वी तिने करिअरला सुरुवात केली होती. २०१० साली आलेला 'तीन पत्ती' तिचा पहिला सिनेमा होता जो फारसा चालला नाही. २०१३ साली आलेल्या 'आशिकी २' सिनेमाने श्रद्धाला खरी ओळख मिळवून दिली.