Stree 2 : 'स्त्री 2' च्या प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज, 15 ऑगस्ट नव्हे तर त्याआधीच श्रद्धा गाजवणार थिएटर, होणार Night Shows
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:10 IST2024-08-08T14:07:03+5:302024-08-08T14:10:04+5:30
प्रेक्षकांना खास सरप्राईज देत निर्मात्यांनी 'स्त्री 2' चाे खास Night Shows ठेवले आहे.

Stree 2 : 'स्त्री 2' च्या प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज, 15 ऑगस्ट नव्हे तर त्याआधीच श्रद्धा गाजवणार थिएटर, होणार Night Shows
अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या जोडीचा सुपरहिट चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल असलेला 'स्त्री 2' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता 'स्त्री 2' च्या रिलीजला फक्त एक आठवडा उरला आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर 'स्त्री 2' प्रदर्शित होणार होता. पण, आता यात एक अपडेट आलं आहे.
प्रेक्षकांना खास सरप्राईज देत निर्मात्यांनी 'स्त्री 2' चाे खास Night Shows ठेवले आहे. तेही 15 ऑगस्टच्या एक दिवस आधी. म्हणजेच प्रेक्षकांना 15 ऑगस्टला रिलीज होणारा हा चित्रपट 14 ऑगस्टलाच पाहता येणार आहे. अर्थातच एक दिवस आधीच 'स्त्री 2' हा चित्रपट बघता येणार आहे. देशभरात विशेष स्क्रीनिंग संध्याकाळी 7.30 नंतर केले जाणार आहे. त्यासाठी मर्यादित तिकीटे असतील. त्यामुळे तुम्हाला जर 14 तारखेलाच चित्रपट बघायचा असेल तर त्यासाठी लवकर तिकीट बुक करावे लागेल.
'स्त्री' या चित्रपटाने 2018 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता सहा वर्षांनंतर याच चित्रपटाचा 'स्त्री 2' सीक्वेलविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 'स्त्री 2' मॅडॉक फिल्म्सच्या सुपरनॅचरल युनिव्हर्सची जननी आहे. हा सिनेमा या युनिव्हर्ससंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. 'मुंज्या', 'भेडिया' आणि 'स्त्री' हे तिन्ही चित्रपट दिनेश विजन यांच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा भाग आहेत.