श्रद्धा कपूरच्या सिनेमात 'या' अभिनेत्रीने साकारली 'स्त्री'ची भूमिका, चेहराच झाकल्याने मिळाली नाही ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:48 PM2024-09-04T13:48:36+5:302024-09-04T13:49:05+5:30

तुम्हाला माहितीये का लाल घुंगट मध्ये दिसणाऱ्या 'स्त्री' ची भूमिका नक्की कोणी केली?

Shraddha Kapoor stree 2 movie actress Bhumi Rajgor played stree s role | श्रद्धा कपूरच्या सिनेमात 'या' अभिनेत्रीने साकारली 'स्त्री'ची भूमिका, चेहराच झाकल्याने मिळाली नाही ओळख

श्रद्धा कपूरच्या सिनेमात 'या' अभिनेत्रीने साकारली 'स्त्री'ची भूमिका, चेहराच झाकल्याने मिळाली नाही ओळख

श्रद्धा कपूर, राजकुमार रावचा नुकताच रिलीज झालेला 'स्त्री 2' (Stree 2) बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. २०१८ साली आलेल्या स्त्री सिनेमाचा हा सीक्वेल आहे. यावेळी चंदेरी गावात सरकटे का आतंक आहे तर शेवटी सरकटेचा वध करण्यासाठी स्त्री ला च यावं लागतं असं दाखवण्यात आलं आहे. पण तुम्हाला माहितीये का लाल घुंगट मध्ये दिसणाऱ्या 'स्त्री' ची भूमिका नक्की कोणी केली?

2018 साली 'स्त्री' सिनेमा आला त्यात अभिनेत्री फ्लोरा सायनीने ही भूमिका साकारली होती. तर आता 'स्त्री 2' मध्ये अभिनेत्री भूमि राजगोरने (Bhumi Rajgor) फ्लोराला रिप्लेस केले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भूमीने तिचा स्त्री 2 मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, "मी आधी स्त्री 2 मध्ये वेगळ्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण नंतर त्यांनी मला स्त्री ची भूमिका ऑफर केली. यामुळे मी ब्लँक झाले. त्यांनी मला ऑडिशनमध्ये जीवाच्या आकांताने किंचाळायला सांगितलं. ही माझ्या आयुष्यातली सर्वात कॉमेडी ऑडिशन होती. मेकर्स मला म्हणाले, "तू सिनेमात भूताच्या भूमिकेत आहे त्यामुळे तुझा चेहरा दिसणार नाही."


ती पुढे म्हणाली, "हे जेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा त्यांना फारसं पटलं नाही. कारण मी सिनेमात आहे हे कोणीच ओळखू शकणार नव्हतं. पण मला इतक्या टॅलेंटेड कलाकारांसोबत काम करण्याची संधी सोडायची नव्हती. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. श्रद्धा तर माझ्यासोबत खूप छान बोलायची. हा फक्त पंकज त्रिपाठींसोबत माझा एकही सीन नव्हता याचं मला वाईट वाटतंय."

भूमी राजगोरने याआधी 'फक्त महिलाओ माटे','सत्यप्रेम की कथा','हरी ओम हरी' सिनेमांमध्ये काम केलं आहे. भूमी मूळची अहमदाबादची असून ती आधी मेकअप आर्टिस्ट होती. 

Web Title: Shraddha Kapoor stree 2 movie actress Bhumi Rajgor played stree s role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.