श्रद्धा कपूर करणार वरुण धवनच्या 'भेडिया २'मध्ये केमिओ? अभिनेत्रीनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:18 IST2024-12-11T17:16:47+5:302024-12-11T17:18:02+5:30

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' या चित्रपटाने यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ती लवकरच वरुण धवनच्या 'भेडिया २' चित्रपटात केमिओ करणार आहे.

Shraddha Kapoor to make a cameo in Varun Dhawan's 'Bhedia 2'? The actress left her silence | श्रद्धा कपूर करणार वरुण धवनच्या 'भेडिया २'मध्ये केमिओ? अभिनेत्रीनं सोडलं मौन

श्रद्धा कपूर करणार वरुण धवनच्या 'भेडिया २'मध्ये केमिओ? अभिनेत्रीनं सोडलं मौन

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor)ने यावर्षी बॉक्स ऑफिसवर तिच्या 'स्त्री २' (Stree 2) चित्रपटातून खळबळ उडवून दिली आहे. 'स्त्री २' चित्रपटात श्रद्धा कपूरला लोकांचे खूप प्रेम मिळाले आहे. त्याचवेळी वरुण धवनच्या आगामी 'भेडिया २' (Bhediya 2) या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरचे नाव सातत्याने चर्चेत आहे. वरुणच्या 'भेडिया २' या चित्रपटाबाबत श्रद्धा कपूरने नुकतेच मौन सोडले आहे.

श्रद्धा कपूरने यावर्षी तिच्या 'स्त्री २' चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'स्त्री २' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर चाहते 'स्त्री ३'च्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, श्रद्धा कपूरने अलिकडेच दक्षिण अरेबियामध्ये आयोजित रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये भाग घेतला आहे. श्रद्धा कपूरनेही या फेस्टिव्हल संबंधित फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'भेडिया २'मध्ये श्रद्धा कपूर करणार केमिओ?
वरुण धवनच्या 'भेडिया 2' या चित्रपटात श्रद्धा कपूरच्या केमिओची सगळीकडे बरीच चर्चा आहे. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान श्रद्धा कपूरला वरुणच्या 'भेडिया २' या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. यावर श्रद्धा कपूरने उत्तर दिले की, 'मॅडॉकच्या इतर कोणत्याही चित्रपटात माझा दुसरा केमिओ असेल की नाही हे येणारा काळच सांगेल.' आता श्रद्धा कपूर अभिनेता वरुण धवनच्या 'भेडिया २' या चित्रपटाचा भाग असेल की नाही हे पाहणे कमालीचे ठरेल.

आगामी प्रोजेक्ट
या मुलाखतीत श्रद्धा कपूरनेही तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले. श्रद्धा कपूर म्हणाली, 'मी लवकरच करत असलेल्या चित्रपटांबद्दल अपडेट देईन, ज्याचे शूटिंग मी पुढील वर्षापासून सुरू करणार आहे.' मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक निखिल द्विवेदीच्या आगामी 'नागिन' चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Shraddha Kapoor to make a cameo in Varun Dhawan's 'Bhedia 2'? The actress left her silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.