Shraddha Kapoor : श्रद्धाने घेतला वडापावचा आस्वाद, पुणेकरांसोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:05 PM2023-02-16T12:05:20+5:302023-02-16T12:07:52+5:30

'व्हॅलेंटाइन डे'च्या खास प्रसंगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब देत श्रद्धाने हा खास दिवस सेलिब्रेट केला.

Shraddha kapoor visits pune city eats vadapav and celebrated 'Valentine's Day' in pune ahead of her next movie promotion | Shraddha Kapoor : श्रद्धाने घेतला वडापावचा आस्वाद, पुणेकरांसोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

Shraddha Kapoor : श्रद्धाने घेतला वडापावचा आस्वाद, पुणेकरांसोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

googlenewsNext

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Randbir Kapoor) आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. याच  सिनेमाच्या प्रमोशनसाठी श्रद्धा पुण्यात दाखल झाली. नुकताच साजरा करण्यात आलेल्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या खास प्रसंगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब देत श्रद्धाने हा खास दिवस सेलिब्रेट केला. यावेळी श्रद्धाची एक झलक पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

श्रद्धाने या पुणे दौऱ्यात 'सेवेन वंडर्स' (Seven Wonders)लाही भेट दिली. प्रसिद्ध आयफेल टॉवरखाली श्रद्धाने वडापावचा आस्वाद घेतला. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  इतकंच नाही तर श्रद्धाने पुण्यातील प्रसिद्ध 'काटाकिर्र' मिसळीचाही आनंद लुटला. अशातच, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर श्रद्धा आणि रणबीर दोघेही विविध ठिकाणी प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांनी सिनेमा निर्मित केला आहे. येत्या  8 मार्च रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Shraddha kapoor visits pune city eats vadapav and celebrated 'Valentine's Day' in pune ahead of her next movie promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.