​टायगर श्रॉफसोबत काम करण्यास श्रद्धा कपूर झाली उतावीळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2017 04:50 AM2017-06-06T04:50:30+5:302017-06-06T10:20:30+5:30

टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर स्टारर ‘बागी’ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  या चित्रपटाची कथा, गाणे, अ‍ॅक्शन या सगळ्या ...

Shraddha Kapoor was very good to work with Tiger Shroff! | ​टायगर श्रॉफसोबत काम करण्यास श्रद्धा कपूर झाली उतावीळ!

​टायगर श्रॉफसोबत काम करण्यास श्रद्धा कपूर झाली उतावीळ!

googlenewsNext
यगर श्रॉफ व श्रद्धा कपूर स्टारर ‘बागी’ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  या चित्रपटाची कथा, गाणे, अ‍ॅक्शन या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. यातील टायगर व श्रद्धाची केम्मिस्ट्री लाजवाब अशीच होती. या चित्रपटाचा सीक्वल येणार, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि अखेर गत महिन्यात या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. पण आता आम्ही जी बातमी तुम्हाला ऐकवणार आहोत, ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
होय, ‘बागी’च्या सीक्वलमध्ये काम करण्यात श्रद्धा उतावीळ झाली आहे. इतकेच नाही तर, मला ‘बागी’च्या सीक्वलमध्ये काम करायचे आहे, हे तिने निर्मात्यांनाही सांगून टाकले आहे. पण श्रद्धाची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, असे दिसतेय. होय, चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियावाला याबाबतीत एकदम क्लिअर आहेत. ‘बागी’च्या सीक्वलमध्ये कोण हिरोईन असणार, याबाबत त्यांना कुठलीही शंका नाही. होय, ‘बागी’च्या सीक्वलमध्ये साजिद दिशा पटानीला घेणार आहेत. टायगर व दिशा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार, अशी बºयाच दिवसांपासून चर्चा होती. साजिद नाडियावाला यांच्या पुढाकाराने ही चर्चा खरी ठरणे जवळपास नक्की आहे.
खरे तर ‘बागी’साठीही दिशा पटानी हीच पहिली पसंत होती. पण निर्मात्याला त्यावेळी या चित्रपटात एक ओळखीचा चेहरा हवा होता. त्यामुळे ऐनवेळी दिशाऐवजी श्रद्धाला ही संधी मिळाली. पण आता श्रद्धाला ‘बागी’च्या सीक्वलमध्येही काम करायचे आहे. पण निर्मात्याला आता टायगर व दिशा या जोडीला घेऊन सीक्वल काढायचा आहे. याचे कारण म्हणजे टायगर व दिशा रिअल लाईफमध्येही रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे या दोघांना एकत्र कास्ट करणे फायद्याचा सौदा ठरेल, असे निर्मात्याचे मत आहे. आता हा सौदा किती फायद्याचा ठरेल, हे बघूच.

Web Title: Shraddha Kapoor was very good to work with Tiger Shroff!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.