अगदी बहीण पद्मिनी कोल्हापूरेसारखी दिसते श्रद्धा कपूरची आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 02:52 PM2021-03-04T14:52:32+5:302021-03-04T14:56:27+5:30
शक्ती कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्यांच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे.
श्रद्धा कपूरचा काल वाढदिवस झाला. तिने तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबियांसोबत मालदिवमध्ये सेलिब्रेट केला. श्रद्धा ही शक्ती कपूर यांची मुलगी असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रद्धाच्या साहो आणि छिछोरे या दोन्ही चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
शक्ती कपूर गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. तुम्हाला माहीत आहे का, शक्ती कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्यांच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे. शक्ती यांची पत्नी दिसायला अतिशय सुंदर असून ती खूपच कमी वेळा सार्वजिनिक ठिकाणी शक्ती किंवा श्रद्धासोबत हजेरी लावते. पण शक्ती कपूर यांच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर आपल्याला त्यांच्या पत्नीचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
शिवांगी या अगदी त्यांची बहीण पद्मिनी कोल्हापूरे यांच्यासारख्याच दिसतात. शिवांगी यांना पद्मिनी आणि तेजस्विनी अशा त्यांना दोन बहिणी आहेत. तेजस्विनीदेखील अभिनेत्री असून तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूर यांच्यासोबत काम केले आहे. खरे तर हा चित्रपट आधी पद्मिनी कोल्हापूरेला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणास्तव पद्मिनीला या चित्रपटात काम करणे शक्य झाले नाही आणि या चित्रपटात शिवांगी यांची वर्णी लागली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. पण याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिवांगी आणि शक्ती कपूर यांच्यात अफेअर सुरू झाले आणि त्यांनी 1982 मध्ये कोर्टात लग्न केले. शिवांगी या लग्नाच्यावेळेस केवळ 18 वर्षांच्या असल्याने या लग्नाला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. पण काही काळाने हा विरोध मावळला.