प्रसिद्ध अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं तब्बल ३० किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:06 IST2025-01-21T18:06:34+5:302025-01-21T18:06:55+5:30

अतिशय स्लिमट्रिम लूकमध्ये जबरदस्त हॉट दिसणारी ही अभिनेत्री पहिल्यापासूनच अशी नव्हती. 

Shreya Chaudhry's shares inspiring journey of losing 30 kgs Bandish Bandits star Suffered slip-disc at 19 | प्रसिद्ध अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं तब्बल ३० किलो वजन

प्रसिद्ध अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं तब्बल ३० किलो वजन

Shreya Chaudhry: सेलिब्रिटी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा सेलिब्रिटींचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो व्हायरल होतात. कधी भूमिकेसाठी तर कधी बारीक होण्यासाठी कलाकार वजन घटवतात. अशाच एका अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन (Shreya Chaudhry Weight Loss Journey) पाहून चाहते थक्क झाले आहेत. ही अभिनेत्री आहे श्रेया चौधरी. अलिकडेच श्रेया ही बंदिश बँडिट्स  (Bandish Bandits) सीरिजमध्ये झळकली. यामधील  तिच्या लूक्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पण, तुम्हाला माहितेय अभिनेत्री पहिल्यापासूनच अशी स्लिमट्रिम नव्हती. 

अतिशय स्लिमट्रिम लूकमध्ये जबरदस्त हॉट दिसणारी श्रेया चौधरी काही वर्षांपुर्वी कशी होती याचे काही फोटो तिने स्वत:च सोशल मिडियावर शेअर केले होते. जुन्या फोटोमध्ये श्रेया अतिशय जाड दिसते आहे. पण, तिने वजन कमी केलं, स्वत:मध्ये हा बदल घडवून आणला. आज सगळे श्रेया चौधरीवर फिदा आहेत.  पण श्रेयाचा फिटनेसचा प्रवास फारसा सोपा नव्हता. १९ व्या वर्षी स्लिप डिस्क झालं, वजन ३० किलोपर्यंत वाढलं होतं. पण त्यावर मात करून तिने तिचे स्वप्न गाठले.

 श्रेयाने तिच्या लहानपणीच्या आदर्श ऋतिक रोशनला तिच्या फिटनेससाठी प्रेरणा दिल्याबद्दल श्रेय दिलं होतं. आता, एका हृदयस्पर्शी पोस्टमध्ये, तिने तिच्या फिटनेसची गाडी रुळावरून का उतरली होती याचे खरे कारण उघड केले आहे. तिनं लिहलं, "मी जेव्हा सोशल मीडियावर माझ्या फिटनेसच्या संघर्षाबद्दल सांगितलं, तेव्हा लोकांकडून इतका स्नेह आणि पाठिंबा मिळेल असं वाटलं नव्हतं. मला सशक्त वाटलं, म्हणून मी माझं मन मोकळं केलं. लोकांची सकारात्मक प्रतिक्रिया मला अजूनही काहीतरी शेअर करायला प्रेरणा देते. मी हे सगळं उघड केलंय, कारण लोकांनी स्वतःवर आणि त्यांच्या मानसिक सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर ते कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात".


श्रेया पुढे म्हणाली, "१९ व्या वर्षी माझ्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. मी मानसिकदृष्ट्या खूपच खालावले होते. या सगळ्यात माझं वजन खूप वाढलं. यामुळे माझ्या आरोग्यावरही परिणाम झाला. कोणतीही शारीरिक हालचाल बंद झाली आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यात स्लिप डिस्क झाल्याने सगळं आणखी कठीण झालं. पण मी माझ्या स्वप्नांसाठी खूप महत्त्वाकांक्षी होते, त्यामुळे हा एक मोठा धक्का होता. मी स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचं मला जाणवलं".

"एका रात्री मी स्वतःला सांगितलं की आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी मला स्वतःला निरोगी ठेवायचं होतं. त्यानंतर मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं, ३० किलो वजन कमी केलं, आणि स्लिप डिस्कची समस्या कधीच परत आली नाही. आज मी माझ्या फिटनेसच्या उत्तम अवस्थेत आहे. फिट राहूनच मी अभिनेत्री होऊ शकले. मला वाटतं की जीवनातल्या अडथळ्यांकडे नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी, त्यांना सकारात्मकतेने बघायला हवं. शेवटी, जीवन ही एक भेट आहे आणि आपण ती संपूर्णपणे जगायला हवी".

Web Title: Shreya Chaudhry's shares inspiring journey of losing 30 kgs Bandish Bandits star Suffered slip-disc at 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.