मोठी बातमी! अमेरिकेत कॉन्सर्टनंतर पूर्णपणे गेला श्रेया घोषालचा आवाज, डॉक्टरांनी केले उपचार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:20 PM2022-11-21T13:20:54+5:302022-11-21T13:22:26+5:30

बॉलीवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल हिनं धक्कादायक खुलासा केला आहे. श्रेयानं तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये दिलेल्या माहितीनं सर्वांनाच धक्का बसला आहे.

shreya ghoshal had lost her voice completely after concert could not sing shocking post | मोठी बातमी! अमेरिकेत कॉन्सर्टनंतर पूर्णपणे गेला श्रेया घोषालचा आवाज, डॉक्टरांनी केले उपचार अन्...

मोठी बातमी! अमेरिकेत कॉन्सर्टनंतर पूर्णपणे गेला श्रेया घोषालचा आवाज, डॉक्टरांनी केले उपचार अन्...

googlenewsNext

नवी दिल्ली-

बॉलीवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल हिनं धक्कादायक खुलासा केला आहे. श्रेयानं तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये दिलेल्या माहितीनं सर्वांनाच धक्का बसला आहे. सलगच्या कॉन्सर्टमध्ये व्यग्र असणाऱ्या श्रेया घोषाल हिचा आवाज एका कॉन्सर्टनंतर पूर्णपणे गेला होता. श्रेयानंच या संपूर्ण घटनेची आपबिती सांगितली आहे. आता ती ठीक असून पुढचे कॉन्सर्टही व्यवस्थित करत आहे. पण तिच्यासोबत घडलेल्या या प्रसंगामुळे चाहते श्रेयाबाबत काळजी व्यक्त करत आहेत. 

ऑरलँडो येथील कॉन्सर्टनंतर आपला आवाज पूर्णपणे गेला होता. काहीच बोलता येत नव्हतं. पण डॉक्टरांच्या उपचारानंतर आती ठीक आहे. त्यानंतर एक कॉन्टर्स देखील उत्तमरित्या पूर्णत्वास गेला, अशी माहिती श्रेयानं तिच्या इन्स्टास्टोरीतून दिली आहे. "आज मी खूप इमोशनल आहे. माझं माझ्या बँड, कुटुंब आणि आपल्या टीमवर खूप प्रेम आहे. त्यांनी मला पाठिंबा दिला आणि कठीण काळात माझ्यासोबत उभे राहिले. कोणतीही कठीण परिस्थिती माझ्यासमोर असली तरी त्यातूनही बाहेर पडण्यासाठी माझी मदत या व्यक्तींनी केली आहे", असंही एका स्टोरीमध्ये श्रेया घोषालनं म्हटलं आहे. 

श्रेया घोषालनं व्यक्त केलं दु:ख
श्रेयानं आणखी एक इन्स्टास्टोरी शेअर करत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला. "काल ऑरलँडोमधील नाइट कॉन्सर्टनंतर माझा आवाज पूर्णपणे गेला होता. माझ्या हितचिंतकांच्या प्रार्थनांमुळे आणि डॉक्टर समीर भार्गव यांच्या उपचारामुळे मला माझा आवाज पुन्हा मिळाला. यानंतर मी न्यूयॉर्कच्या एरिनामध्ये सलग तीन तासांचा कॉन्सर्टही करू शकले आहे. न्यूयॉर्क शहरानं मला खूप प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे", असं श्रेयानं इन्स्टास्टोरीत लिहिलं आहे. श्रेया घोषालचा अमेरिका दौरा आता संपला आहे. आपल्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगालाही सामोरं जात न थांबता काम करावं, शो मस्ट गो ऑन अशी भावना श्रेयानं व्यक्त केली आहे. 

फॅन्स झाले भावूक
श्रेया घोषालच्या पोस्टनंतर चाहते प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. अनेकांनी श्रेयाच्या तब्येतीची विचारपूस आणि काळजी व्यक्त केली. तसंच तिला आरामाचाही सल्ला दिला आहे. श्रेया आता सुखरूप असल्याबद्दलही अनेकांनी देवाचे आभार मानले आहेत. तसंच तिचा आवाज जाणं म्हणजे एका भयानक स्वप्नासारखं आहे, हे असं कधीच होऊ नये, अशी भावनाही व्यक्त करत आहेत. अगदी काही तासांसाठी श्रेयावर असा प्रसंग ओढावला असला तरी या घटनेनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. 

श्रेया घोषाल ही बॉलीवूडची आघाडीची गायिका आहे. तिला ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून श्रेया गात आहे. तिनं आजवर भारतीय सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. सारेगमपा या रिआलिटी शोमध्ये तिनं सहभाग घेतला होता आणि शो जिंकला देखील होता. तिनं हिंदीसह इतरही अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. देशासह जगभरात श्रेयाचे कोट्यवधी चाहते आहेत.  

Web Title: shreya ghoshal had lost her voice completely after concert could not sing shocking post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.