सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते श्रेयस तळपदेची पत्नी,वाचा त्यांच्या प्रेमाची गोष्ट !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 03:56 PM2020-06-13T15:56:10+5:302020-06-13T16:01:17+5:30
जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो.
त्याने तिला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत तिनं त्याला क्लीनबोल्ड केलं. तिला पाहताच त्याच्या दिल की घंटी बजने लगी आणि ती त्याच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे ती अभिनेता श्रेयस तळपदेची. १४ वर्षांपूर्वी रेशीमगाठीत अडकलेल्या श्रेयस आणि दीप्तीची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल. कॉलेजमधील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्याचे निमित्त ठरलं आणि दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यावेळी श्रेयसला दीप्ती पाहताक्षणी आवडली तर दीप्तीला श्रेयसचा साधेपणा भावला. दोघांचं प्रेम खुलू लागलं आणि दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या १४ वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.
दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. दुसरीकडे श्रेयसही आपल्या सगळ्या यशाचे श्रेय दीप्तीलाच देतो. करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो.
जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो.
दोघांमध्ये कितीही भांडणं झाली तरी काही क्षणात ते विसरतो असं ती सांगते. कितीही कडाक्याचे भांडण झालं तरी नव्या दिवसाची सुरुवात गोड बोलून करतो आणि तेच आपल्या यशस्वी नात्याचे गमक आहे.