श्री सखी राज्ञी जयती! महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, 'छावा'मधील लूक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:23 IST2025-01-21T12:22:28+5:302025-01-21T12:23:48+5:30
Chhaava Movie Rashmika Mandanna : 'छावा' या चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

श्री सखी राज्ञी जयती! महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना, 'छावा'मधील लूक समोर
विकी कौशल(Vicky Kaushal)चा आगामी चित्रपट 'छावा'(Chhaava Movie)ची घोषणा केल्यापासून चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचे बरेच नवीन पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. आता अवघ्या काही मिनिटांपूर्वी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा लूक रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे, याबद्दल माहितीदेखील देण्यात आली आहे.
मॅडॉक फिल्म्सने नुकताच छावा या चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, 'प्रत्येक महान राजाच्या मागे, अतुलनीय ताकदीची राणी उभी असते. स्वराज्याचा अभिमान - महाराणी येसूबाईच्या रुपात रश्मिका मंदाना यांची ओळख.' यात दोन लूकमधील फोटो शेअर केले आहेत. मराठमोळ्या अंदाजात रश्मिका खूपच सुंदर दिसते आहे.
चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
छावा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याच वेळी, चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याची विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लक्ष्मण उतेकर यांनी छावा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान असून ज्येष्ठ संगीतकार ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. 'छावा'मध्ये छत्रपती शंभूराजेंच्या भूमिकेत विकी कौशल, येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार आहे. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होतोय. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चंं दिग्दर्शन केलंय.