"रिलेशनशिप आवडतं, पण लग्न..." काय म्हणाली कमल हासन यांची लेक श्रुती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:16 IST2024-12-26T14:16:33+5:302024-12-26T14:16:50+5:30

अभिनेत्रीनं लग्नावर थेट मत मांडलं.

Shruti Haasan Opens Up About Marriage And Relationship | "रिलेशनशिप आवडतं, पण लग्न..." काय म्हणाली कमल हासन यांची लेक श्रुती ?

"रिलेशनशिप आवडतं, पण लग्न..." काय म्हणाली कमल हासन यांची लेक श्रुती ?

Shruti Haasan : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची लेक श्रुती हसनही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण, आपल्या अभिनय कारकिर्दीपेक्षा श्रुती हासन तिच्या खासगी आयुष्यामुळेच सर्वाधिक चर्चेत असते. तिचे चाहते तिला कायम लग्न कधी करणार, याबद्दल विचारत असतात. आता अभिनेत्रीनं लग्नावर थेट मत मांडलं.  लग्नापेक्षा रिलेशनशिपमध्ये राहणे जास्त पसंत असल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.

श्रुती हिनं नुकतंच 'पिंकविला'सी संवाद साधला. यावेळी तिला लग्न न करण्याच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा उत्तर देत श्रुतीनं आपली भूमिका स्पष्ट केली.  श्रुती म्हणाली, "लग्नापेक्षा मला रिलेशनशिप आवडतं. मला रोमान्स देखील आवडतो. मला नात्यात राहायला आवडतं, पण एखाद्याशी जास्त जोडलं जाण्यास मला थोडी भीती वाटते.  पण कधीच नाही असं म्हणता येणार नाही. कुणी खास आलं तर, पण मला तसं काही वाटतं नाही".

श्रुतीचा विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भूतकाळातील अनुभवांवर नाही तर वैयक्तिक विश्वासांवर आधारित असल्याचं तिनं सांगितलं. तसेच ती म्हणाली, "जवळच्या मित्रांचे यशस्वी विवाह पाहिलेत. सकारात्मक उदाहरणे असूनही दृष्टीकोन बदललेला नाही". लग्नावर बोलण्याची श्रुतीची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपुर्वी एका चाहत्यानं तिला लग्नाबद्दल विचारलं होतं. तर तिने  "हे प्रश्न विचारणे थांबवा", असं म्हटलं होतं. 

दरम्यान, श्रुती सध्या सिंगल आहे. श्रुती हसनचं नुकतंच तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिकासोबत ब्रेकअप झालं आहे. श्रुती आणि शंतनू हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, परंतु त्यांनी एप्रिलमध्ये इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्रुती रजनीकांतसोबत 'कुली' नावाच्या चित्रपटात झळकणार आहे.वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर श्रुती बहुप्रतिक्षित 'सालार २' मध्ये पाहायला मिळणार आहे, ज्यात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. श्रुतीचं नाव बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ते नागा चैतन्यपर्यंत बऱ्याच अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं.

Web Title: Shruti Haasan Opens Up About Marriage And Relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.