साऊथनंतर श्रुती मराठेचा बॉलिवूड सिनेमा, नाना पाटेकरांसोबत करणार स्क्रीन शेअर, ट्रेलरमध्ये दिसली झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 04:54 PM2024-12-02T16:54:38+5:302024-12-02T16:55:24+5:30
मराठी कलाविश्व गाजवणारी श्रुती साऊथ आणि बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. अलिकडेच 'देवरा' या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
श्रुती मराठे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सनई चौघडे या सिनेमातून तिने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पण, राधा ही बावरी या मालिकेने श्रुतीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. श्रुतीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. मराठी कलाविश्व गाजवणारी श्रुती साऊथ आणि बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. अलिकडेच 'देवरा' या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
श्रुतीच्या या नवीन हिंदी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वनवास या नाना पाटेकर यांच्या सिनेमात श्रुतीची वर्णी लागली आहे. वनवास सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिची झलक पाहायला मिळत आहे. या सिनेमात श्रुतीने नाना पाटेकर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सिनेमाचा ट्रेलर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
वनवास सिनेमात नाना पाटेकर आणि अभिनेता उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. गदर सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २० डिसेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.