आई-वडील मोठे अभिनेते पण श्वेता चित्रपटांपासून दूर; बालपणीचा 'तो' आघात ठरला कारण अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 17:35 IST2023-03-17T17:27:52+5:302023-03-17T17:35:32+5:30
Shweta Bachchan Nanda : श्वेता बच्चन लहान असताना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत शूटिंगच्या सेटवर जायची.

आई-वडील मोठे अभिनेते पण श्वेता चित्रपटांपासून दूर; बालपणीचा 'तो' आघात ठरला कारण अन्...
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा लाइम लाईटपासून दूर राहते. तिने तिच्या आई-वडिलांप्रमाणे अभिनयाकडे कधीच लक्ष दिले नाही. श्वेता बच्चन लहान असताना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत शूटिंगच्या सेटवर जायची. याच दरम्यान एकदा तिचा हात सॉकेटमध्ये अडकल्याने तिला शॉक बसला आणि तो आघात तिच्या मनावर कोरला गेला. यानंतर ती कधीच तिच्या आई-वडिलांसोबत शूटिंग सेटवर गेली नाही.
श्वेताला तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये अभिनयाची आवड होती आणि ती थिएटरमध्ये काम करायची. याच दरम्यान, ती एक नाटक करत होती जिथे ती रंगमंचावरील शेवटचा सीन ती विसरली. या घटनेने ती निराश झाली आणि तिने अभिनय करण्याचा विचार मनातून काढून टाकला. श्वेता बच्चनने एका मुलाखतीदरम्यान या घटनेचा उल्लेख केला होता.
श्वेताने यासोबतच हेही सांगितले होते की, मुलगी नव्या नवेली नंदा हिचाही अभिनय क्षेत्रात येण्याचा कोणताही विचार नाही. तिचा मुलगा अगस्त्य नंदाने ओटीटीवर डेब्यू केलं आहे. श्वेता बच्चन नंदा हिचा जन्म 17 मार्च 1974 रोजी मुंबईत झाला. श्वेता ही अमिताभ बच्चन यांची मोठी मुलगी आहे. तिचा आणि वडिलांचा खास बॉन्ड आहे.
श्वेता नेहमीच वडिलांच्या तब्येतीची काळजी घेते. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांना संबोधित करताना अनेकवेळा ती दिसली आहे. अमिताभ बच्चन देखील सोशल मीडियावर आपल्या मुलीच्या नावावर भावनिक पोस्ट लिहित असतात आणि आपल्या जुन्या आठवणी चाहत्यांशी शेअर करत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"