श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉलिवूड डेब्यू लांबला, वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 01:53 PM2018-06-18T13:53:48+5:302018-06-18T19:23:48+5:30

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात असलेली अभिनेत्री म्हणजे, श्वेता तिवारी. या श्वेता तिवारीची ...

Shweta Tiwari's lewd Bollywood debut is far removed, because what is the reason !! | श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉलिवूड डेब्यू लांबला, वाचा काय आहे कारण!!

श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉलिवूड डेब्यू लांबला, वाचा काय आहे कारण!!

googlenewsNext
सौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात असलेली अभिनेत्री म्हणजे, श्वेता तिवारी. या श्वेता तिवारीची मुलगी पलक आता मोठी झालीय. गेल्या अनेक दिवसांपासून पलक बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी चर्चेत आहे. मध्यंतरी ‘वन फिल्म वन वंडर फिल्म’ दर्शील सफारीसोबत पलक डेब्यू करणार, अशी चर्चा होती. quickie असे या चित्रपटाचे नाव असल्याचेही ऐकिवात आले होते. खरे तर या बातमीमुळे श्वेताचे चाहते जाम सुखावले होते. पलकच्या डेब्यूची त्यांना आतूरतेने प्रतीक्षा होती. पण आता ही बातमी आता पूर्णपणे अफवा सिद्ध झाली आहे. होय, स्वत: पलकची मॉम श्वेता हिनेचं तसा खुलासा केला. पलकचा एक सुंदर फोटो शेअर करत, श्वेताने हा खुलासा केला.
माझी मुलगी यंदा बारावीत आहे. तूर्तास ती कुठलाही चित्रपट करू शकत नाही. सध्या ती केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणार आहे. quickieमधून पलकचा डेब्यू व्हावा, हा आमचा प्रयत्न होता. पण ही प्रक्रिया खूप लांबणारी होती. त्यातच पलकच्या १२ वीचा अभ्यास सुरू झाला असल्याने आम्ही या प्रोजेक्टमधून स्वत:च अंग काढून घेतले. कारण या घडीला सगळ्यांपेक्षा पलकसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. पण मी तुम्हाला आश्वस्त करते की, पलकचा डेब्यू लवकरच होईल, असे श्वेताने स्पष्ट केले.

ALSO READ : श्वेता तिवारी सुंदर मुलगी बनणार दर्शील सफारीची हिरोईन!

एकंदर काय तर श्वेताच्या या खुलाशाने चाहत्यांची काहीशी नाराजी झाली. पण शेवटी श्वेता म्हणते त्याप्रमाणे, शिक्षण महत्त्वाचे़ तेव्हा काही काळ प्रतीक्षा ही करायलाच हवी.

Web Title: Shweta Tiwari's lewd Bollywood debut is far removed, because what is the reason !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.