श्वेता त्रिपाठीचे शुभमंगल सावधान! असा होता ‘ब्राईडल लूक’ !!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:03 PM2018-06-29T22:03:37+5:302018-06-29T22:04:22+5:30

‘मसान’ची अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज शुक्रवारी गोव्यात लग्नबंधनात अडकली. अभिनेता व रॅपर चैतन्य शर्मासोबत तिने लग्नगाठ बांधली. यावेळी श्वेताचा ब्राईडल लूक पाहण्यासारखा होता.

shweta tripathi chaitanya sharma wedding ; This was Bridal Look !! | श्वेता त्रिपाठीचे शुभमंगल सावधान! असा होता ‘ब्राईडल लूक’ !!

श्वेता त्रिपाठीचे शुभमंगल सावधान! असा होता ‘ब्राईडल लूक’ !!

‘मसान’ची अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज शुक्रवारी गोव्यात लग्नबंधनात अडकली. अभिनेता व रॅपर चैतन्य शर्मासोबत तिने लग्नगाठ बांधली. यावेळी श्वेताचा ब्राईडल लूक पाहण्यासारखा होता. लग्नासाठी श्वेताने पापा डोन्ट प्रीच ब्राण्डचा डार्क पिंक लाचा, गोल्डन ब्लाऊज आणि सी ग्रीन दुप्पटा निवडला. 

या लग्नाच्या पोशाखासोबतचे तिचे दागिणेही खास होते. बांगड्या, बिंदी आणि नेकलेसने तिचे सौंदर्य आणखीच खुलवले. या डेस्टिनेशन वेडिंगला अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक तेवढेचं हजर होते. 

सोमवारी श्वेता व  चैतन्य बॅचलर पार्टी झाली आणि मंगळवारपासून या लग्नाचे पारंपरिक विधी सुरू झाले होते.मंगळवारी श्वेताच्या हातांवर मेहंदी सजली आणि  बुधवारी प्री-वेडिंग पार्टी रंगली.

 या प्री-वेडिंग पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले  होते.  यात चैतन्य श्वेतासोबत बराच रोमॅन्टिक झालेला दिसला होता. या पार्टीत श्वेताने पिच कलरच्या लाचा आणि त्यावर लांब जॅकेट घातले होते तर चैतन्य ब्लॅक सूटमध्ये होता.

चैतन्य हा ‘स्लो चीता’ नावाने ओळखला जातो. श्वेतापेक्षा तो पाच वर्षांनी लहान आहे. मुंबईत अ‍ॅक्ंिटग वर्ल्डमध्ये श्वेता व चैतन्य पहिल्यांदा भेटले आणि पुढे भेटींचा हा ‘सिलसिला’ सुरू राहिला.

कदाचित तुम्हाला माहित नसेल पण श्वेता ही दिल्लीचे माजी मुख्य सचिव पी. के. त्रिपाठी यांची मुलगी आहे. खरे तर तिला अभिनेत्री बनण्यात काहीही रस नव्हता. कारण तिला रंगमंच आवडायचा. पण नशिबाने तिला बॉलिवूड चित्रपटातही संधी दिली. ‘मसान’नंतर श्वेता अलीकडे ‘हरामखोर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर केली होती.

 

Web Title: shweta tripathi chaitanya sharma wedding ; This was Bridal Look !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.