​श्वेता त्रिपाठी म्हणते, नवाजुद्दीन सिद्दिकीच सर्वश्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 01:56 PM2017-01-08T13:56:29+5:302017-01-08T13:56:29+5:30

नवाजुद्दीन सिद्दिकी व श्वेता त्रिपाठी यांचा आगामी ‘हरामखोर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात एका शिक्षकाचे त्याच्या ...

Shweta Tripathi says, Nawazuddin Siddiqui is the best | ​श्वेता त्रिपाठी म्हणते, नवाजुद्दीन सिद्दिकीच सर्वश्रेष्ठ

​श्वेता त्रिपाठी म्हणते, नवाजुद्दीन सिद्दिकीच सर्वश्रेष्ठ

googlenewsNext
ong>नवाजुद्दीन सिद्दिकी व श्वेता त्रिपाठी यांचा आगामी ‘हरामखोर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात एका शिक्षकाचे त्याच्या विद्यार्थिनीसोबत असेलेले संबध दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाविषयी अनुभव शेअर करताना श्वेता त्रिपाठी हिने नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या सोबत काम करताना सुरुवातीला मला भीती वाटत होती, पण ते बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ कलावंत असल्याचे सांगितले आहे. 

‘हरामखोर’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी याने शिक्षकाची तर श्वेता त्रिपाठी हिने विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. आपल्या सहअभिनेत्यासोबतचे अनुभव शेअर करताना श्वेता त्रिपाठी म्हणाली, जेव्हा मला कळले क ी नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या अपोझिट मला भूमिका साकारायची आहे त्यावेळी माझ्या मनात भीती निर्माण झाली. त्यांच्यासोबत कसे काम करावे हा प्रश्न माझ्या मनात आला. ते बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ कलाकारांपैकी एक आहेत, याशिवाय त्यांचे व्यक्तिमत्त्व देखील उत्कृष्ठ आहे, माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला त्यांनी हे कधी जाणवू दिले नाही. 

Haramkhor actress Shweta Tripathi says Nawazuddin Siddiqui a remarkable actor

श्वेता म्हणाली, नवाजुद्दीन स्वत:चा अभिनय समोरच्या व्यक्तीच्या स्तरावर येऊन करतात, त्यांच्यासोबत काम करताना असे वाटले क ी त्यांचा व माझा अनुभव एक सारखाच आहे, यामुळेच माझ्या मनात त्यांच्याबद्दल सन्मान निर्माण झाला आहे. मला माहिती नाही कुणी असे करीत असेल. त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही आपले सर्वश्रेष्ठ अभिनय देण्याचा प्रयत्न करता. मी खरोखरच त्यांची प्रशंसक झाली आहे. 

या चित्रपटाची शूटिंग गुजरातच्या एका गावात झाली आहे. यात १४ वर्षाची विद्यार्थिनी भूमिका श्वेता त्रिपाठीने साकारली आहे. या चित्रपटाला अनेक विदेशी फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळविले आहेत. चित्रपटाचा ट्रलेर पाहिल्यावर यातील काही दृष्यात विनोद निर्माण करण्यात आला असल्याचे दिसते. या चित्रपटाला सॅन्सॉर बोडार्ने यू/ए असे प्रमाणपत्र दिले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. श्लोक शर्मा दिग्दर्शित  ह्यहरामखोरह्ण हा चित्रपट गुनीत मोंगा प्रोडक्शन बॅनर सिख्या एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. चित्रपटाच्या शूटिंगपासूनच ‘हरामखोर’वादाच्या भोवºयात अडकलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग केवळ १६ दिवसात पूर्ण  करण्यात आले आहे. 

Web Title: Shweta Tripathi says, Nawazuddin Siddiqui is the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.