श्वेता त्रिपाठीचा 'मिर्जापुर द फिल्म'वर मोठा खुलासा, म्हणाली - "हा एक पॉवरपॅक्ड..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 10:44 IST2024-12-21T10:43:45+5:302024-12-21T10:44:12+5:30
Shweta Tripathi : श्वेता त्रिपाठीने मिर्झापूर यांसारख्या वेब सीरिजमधून लोकप्रियता मिळवली आहे. 'गोलू' या व्यक्तिरेखेसाठी ती तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दरम्यान अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत 'मिर्झापूर द फिल्म'वर मोठा खुलासा केला.

श्वेता त्रिपाठीचा 'मिर्जापुर द फिल्म'वर मोठा खुलासा, म्हणाली - "हा एक पॉवरपॅक्ड..."
बॉलिवूड अभिनेत्री आणि ओटीटी स्टार श्वेता त्रिपाठी(Shweta Tripathi)ने मसान आणि मिर्झापूर यांसारख्या वेब सीरिजमधून लोकप्रियता मिळवली आहे. 'गोलू' या व्यक्तिरेखेसाठी ती तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अलिकडेच नेटफ्लिक्सवर तिच्या ‘ये काली काली आंखे’ या वेब सीरिजचा सीझन २ प्रदर्शित झाला. या सीरिजला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. दरम्यान अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत 'मिर्झापूर द फिल्म'(Mirzapur The Film)वर मोठा खुलासा केला.
श्वेता त्रिपाठीने एका मुलाखतीदरम्यान 'मिर्झापूर द फिल्म'बद्दलची तिची उत्सुकता शेअर केली. ती म्हणाली, 'मिर्झापूर चित्रपटाचा पहिल्या सीझनशी काहीही संबंध नाही. मुन्ना भैया म्हणजेच दिव्येंदू शर्मा देखील त्याचा एक भाग आहे. हा त्या काळावर आधारीत आहे, जेव्हा मुन्ना भैय्या जिवंत होते आणि कदाचित स्वीटीही जिवंत होती. आतापर्यंत आम्हाला निर्मात्यांकडून कोणताही फोन आलेला नाही.
मिर्झापूर चित्रपट सीरिजपेक्षा वेगळा कसा असेल?
चित्रपटाबद्दल बोलताना श्वेता त्रिपाठी म्हणाली, 'माझ्या मते हा चित्रपट पॉवरपॅक्ड असणार आहे. यात पात्रांचा एक वेगळा स्वॅग पाहायला मिळणार आहे. वेब सीरिजपेक्षाही प्रेक्षकांना हा चित्रपट अधिक आवडणार आहे. मी फक्त निर्मात्यांच्या फोनची वाट पाहत आहे. कारण मला माहित आहे की चित्रपटाची स्क्रिप्ट हृदय पिळवटून टाकणारी असेल. पुनीत कृष्णा हा मिर्झापूरच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा लेखक आहे, तो माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहे.
'मिर्झापूर द फिल्म' कधी प्रदर्शित होणार?
श्वेता त्रिपाठीनेही मुलाखतीत सांगितले की, 'हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे कारण स्क्रिप्ट अजून लिहिली जात आहे. हा चित्रपट वेब शोपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. मिर्झापूर चित्रपटात वेब सीरिजमधील कोणताही आशय घेतला जाणार नाही. हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्साहाला नक्कीच न्याय देईल. मी देखील चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप उत्सुक आहे.