'हा' अभिनेता साकारणार 'सिक्सर किंग' युवराज सिंगची मुख्य भूमिका? अभिनेत्यानं दिली मोठी हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 09:31 IST2024-12-24T17:49:32+5:302024-12-25T09:31:41+5:30
सर्वांच्या लाडक्या युवराज सिंगवर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता साकारणार 'सिक्सर किंग'ची भूमिका ?

'हा' अभिनेता साकारणार 'सिक्सर किंग' युवराज सिंगची मुख्य भूमिका? अभिनेत्यानं दिली मोठी हिंट
Yuvraj Singh Biopic : इंडियन क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये युवराज सिंगच्या भूमिकेसाठी बऱ्याच अभिनेत्यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र अखेर 'सिक्सर किंग'च्या भूमिकेसाठी एका अभिनेत्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृतरित्या त्या अभिनेत्याची घोषणा केली नाही. मात्र संबंधित अभिनेत्याची वर्णी लावण्यावर सर्व ठीम असल्याचं कळतंय. एवढंच काय तर संबंधित अभिनेत्यानं याबद्दल मोठी हिंट दिली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा या वर्षी ऑगस्टमध्ये करण्यात आली होती. मात्र, कोणता स्टार कोणत्या भूमिकेत दिसणार हे निर्मात्यांनी सांगितले नाही. आता बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत.
सिद्धांत चतुर्वेदीने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत "वर्ष संपण्याआधी मनात काही ठेवू नका, विचारा" असं म्हणतं आस्क मी सेशन घेतलं. यावेळी त्यानं चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्यानं त्याला त्याचा ड्रीम रोल काय असेल हा प्रश्न केला. यावर उत्तर देताना सिद्धांतने क्रिकेटर युवराज सिंगचा निळ्या जर्सीतील फोटो आणि त्यासोबत सिंहाचा इमोजी शेअर केला. यावरुन सिद्धांता हा युवराज सिंगच्या भुमिकेत पाहायला मिळणार, असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.
दरम्यान, याआधी युवराज सिंगने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने साकारावी अशी त्याची इच्छा आहे. आता सिद्धांतनेदेखील याबद्दल हिंट दिली आहे. युवराज सिंगची कारकिर्द खूपच प्रेरणादायी आहे. त्यामुळे युवराजच्या भुमिकेत अभिनेत्याला पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.