Video: सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणीची नवी कोरी रेंज रोव्हर! किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:24 AM2024-09-02T10:24:09+5:302024-09-02T10:24:53+5:30

सिद्धार्थ आणि कियाराने नुकतंच नवीन कारमधून फेरफटका मारला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Siddharth Malhotra Kiara Advani s New Range Rover couple seen making rounds in mumbai | Video: सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणीची नवी कोरी रेंज रोव्हर! किंमत वाचून व्हाल थक्क

Video: सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणीची नवी कोरी रेंज रोव्हर! किंमत वाचून व्हाल थक्क

सध्या बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक सेलिब्रिटी नवी कोरी कार घरी आणत आहेत. अनेक सेलिब्रिटी रेंज रोव्हर एसयूव्हीच्या प्रेमातच पडल्याचं दिसतंय. रणबीर कपूर, आयुष्मान खुरानानंतर आता सिद्धार्थ मल्होत्रानेही (Siddharth Malhotra)  रेंज रोव्हर घेतली आहे. सिद्धार्थ आणि कियाराने नुकतंच नवीन कारमधून फेरफटका मारला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सिद्धार्थ - कियारा अडवाणी यांच्या नवीन रेंज रोव्हरची किंमत तब्बल ३ कोटी आहे. कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स आहेत जे या कारला खास बनवतात. सध्याच्या लक्झरी कारमध्ये रेंज रोव्हर एसयूव्ही आघाडीवर आहे. म्हणूनच अनेक सेलिब्रिटींनी या कारला पसंती दिली आहे. नुकतंच सिद्धार्थ-कियारा मुंबईच्या रस्त्यावर नव्या कारमधून फेरफटका मारताना दिसले. यावेळी पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


सिद्धार्थ मल्होत्राकडे आधीच लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग आणि मर्सिडीज बेंज एमएल क्लास एसयूव्ही आहे. तर कियाराकडे ऑडी A8L आणि BMW 530D आहे. सिद्धार्थ-कियाराने फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकले. जैसलमेरमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. 

Web Title: Siddharth Malhotra Kiara Advani s New Range Rover couple seen making rounds in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.