सिद्धार्थ मल्होत्राला वाटतेय सर्वात चॅलेजिंग ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 12:22 PM2018-08-10T12:22:57+5:302018-08-10T12:23:56+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा कारगील युद्धातील शहीद मेजर विक्रम बत्रा यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Siddharth Malhotra thinks this role is most challenging | सिद्धार्थ मल्होत्राला वाटतेय सर्वात चॅलेजिंग ही भूमिका

सिद्धार्थ मल्होत्राला वाटतेय सर्वात चॅलेजिंग ही भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देमेजर विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत दिसणार सिद्धार्थ

'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील सिद्धार्थच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्याने 'हंसी तो फंसी', 'एक व्हिलेन', 'कपूर अॅण्ड सन्स', 'बार बार देखो', 'इत्तेफाक' यांसारख्या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसला. नेहमी तो वेगवेगळ्या भूमिकांना प्राधान्य देताना दिसतो. त्याचा आगामी सिनेमात तो कारगील युद्धातील शहीद मेजर विक्रम बत्रा यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका चॅलेजिंग असल्याचे नुकतेच त्याने सांगितले.

सिद्धार्थ बालजी मोशन अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटामध्ये सध्या व्यग्र असून त्याच्याबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तो आगामी चित्रपटाकडे वळणार आहे. त्याचा हा आगामी चित्रपट शहीद मेजर विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत असल्याचे बोलले जात आहे.सिद्धार्थने या आगामी चित्रपटाविषयी नुकतेच त्याचे मत व्यक्त केले असून मेजर बत्रा यांची भूमिका वठविणे म्हणजे एक मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, ‘मेजर बत्रा यांची भूमिका साकारणे हे केवळ माझे काम नाही तर ती माझी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला न्याय देता यावा यासाठी मी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मात्र त्यांच्या भूमिकेला न्याय देणे वाटते तेवढे सोपे नाही. हे फार आव्हानात्मक आहे. त्यामुळे मला प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे’.
सिद्धार्थ मल्होत्रा मेजर विक्रम बत्रा यांची भूमिका वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेतो आहे. तसेच या भूमिकेबाबत त्याच्या मनावर खूप दडपणदेखील आहे. त्याला या वेगळ्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Siddharth Malhotra thinks this role is most challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.