सिद्धार्थ मल्होत्राने लेडी लव्हसाठी लिहिली खास पोस्ट, असा साजरा केला बायकोचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 05:09 PM2024-07-31T17:09:18+5:302024-07-31T17:09:38+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी चाहत्यांचं लाडकं कपल आहे.

Siddharth Malhotra wrote a special post for Lady Love celebrated wife s birthday | सिद्धार्थ मल्होत्राने लेडी लव्हसाठी लिहिली खास पोस्ट, असा साजरा केला बायकोचा वाढदिवस

सिद्धार्थ मल्होत्राने लेडी लव्हसाठी लिहिली खास पोस्ट, असा साजरा केला बायकोचा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) तिच्या सहज सुंदर सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आज कियारा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या कुटुंबासोबत तिने वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. याची झलक तिचा नवरा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Siddharth Malhotra) दाखवली. सिद्धार्थने बायकोसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छाही दिल्या.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी चाहत्यांचं लाडकं कपल आहे. दोघंही कोणताही बडेजाव न दाखवता अगदी साधं आयुष्य जगतात. सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या लेडी लव्हसाठी छानशी पोस्ट शेअर केली आहे. त्याने कियाराचा क्युट फोटो शेअर केला आहे ज्यात ती पांढऱ्या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तसंच तिच्या आजूबाजूला फक्त फुगे आहेत. एकावर सुपरस्टार असंही लिहिलं आहे. 'वी लव्ह यू' म्हणत त्याने पोस्टमध्ये लिहिले, "हॅपी बर्थडे लव्ह. हा फोटो सगळं काही सांगून जातो. तू मला भेटलेली सर्वात प्रेमळ व्यक्ती आहे. अशाच एकत्र आणखी आठवणी बनवूया."


सिद्धार्थ आणि कियारा गेल्याच वर्षी लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथे भव्य पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाआधी दोघांनी काही वर्ष डेटिंग केले. 'शेरशाह'च्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. या सिनेमा सिद्धार्थ कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती तर कियाराने त्यांच्या होणाऱ्या बायकोची भूमिका केली. नंतर त्यांची सिनेमातली रोमँटिक केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही सुरु झाली. 

 

 

Web Title: Siddharth Malhotra wrote a special post for Lady Love celebrated wife s birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.