सिद्धार्थ सागरला ड्रग्जचे व्यसन,आईचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 10:04 AM2018-04-04T10:04:09+5:302018-04-04T15:34:09+5:30
कॉमेडियन सिद्धार्थ सागर बेपत्ता असल्याचे रहस्य तर उलगडले. चार महिने गायब राहिलेला सिद्धार्थ स्वत:हून सामोर आला. पण जगापुढे त्याने ...
क मेडियन सिद्धार्थ सागर बेपत्ता असल्याचे रहस्य तर उलगडले. चार महिने गायब राहिलेला सिद्धार्थ स्वत:हून सामोर आला. पण जगापुढे त्याने काही धक्कादायक खुलासे केलेत. माझी आईच मला जेवणातून ड्रग्ज देत होती. पुढे मला रिहॅबिटेशन सेंटरमध्ये पाठवले आणि एक दिवस पागलखान्यात माझी रवानगी केली गेली, असे काय काय सिद्धार्थने सांगितले. त्याचे हे आरोप ऐकून आता सिद्धार्थची आई अलका सागर समोर आली आहे. त्यांनी स्वत:वरील सगळे आरोप फेटाळून लावतांना सिद्धार्थवर प्रतिआरोप केले आहेत. सिद्धार्थला वाईट संगत लागली होती. तो वाईट नाही. पण अचानक तो बदलला. घरात तोडफोड, मारहाण करायला लागला. त्याचे ते वागणे बघून मला असुरक्षित वाटू लागले. सिद्धार्थला ड्रग्जचे व्यसन आहे. तो या व्यसनाच्या इतका आहारी गेलायं की त्याला जराही रोखटोक सहन होत नाही. लहान-सहान गोष्टीवरही तो प्रचंड संतापतो, हिंसक होतो, असे अलका सागर यांनी म्हटले आहे.
सिद्धार्थने कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी यांच्यासोबत स्टेज शेअर केला आहे.कॉमेडी सर्कस,लाफ्टर के फटके, कॉमेडी सर्कस के अजुबे यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला.
ALSO READ : सिद्धार्थ सागरने केला खुलासा त्याची आईच द्यायची त्याला जेवणातून ड्रग्स
सिद्धार्थचे आरोप
काही दिवसांपूर्वी एका पत्रपरिषदेत सिद्धार्थने आईवर अनेक आरोप केले होते.माझ्या आईच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एक व्यक्ती आली आणि त्यांच्यासोबत तिला नव्याने आयुष्याला सुरुवात करायचीयं, असे मला सांगितले. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे हा विचार करून मी देखील तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. पण काहीच दिवसांत आईचे वागणे खूप बदलले.याचदरम्यान माझे वजन कमी होत होते. त्यामुळे मी स्मोकिंग कमी केले आणि कॉफी जास्त पिऊ लागलो होतो. मी याविषयी आईला सांगितले तर तिने मला सांगितले की, मला बायपोलर नावाचा आजार आहे आणि त्यासाठी ती मला न सांगता माझ्या जेवणातून ड्रग्स देत आहे. या आजाराविषयी ऐकून मला आश्चयार्चा धक्का बसला. कारण मला या आजाराविषयी माहिती होते आणि मला स्वत:मध्ये या आजाराचे संकेत कधीच दिसले नव्हते. माझ्या आर्थिक व्यवहारात सुयश गाडगीळ (आईच्या आयुष्यात असलेली व्यक्ती) ढवळाढवळ करू लागला होता. त्यामुळे अनेकवेळा आमच्यात भांडणं होत असे. माझ्या आईने मला न सांगता माझे ९०-९५ लाख खर्च केले होते. काहीच दिवसांनी त्या दोघांनी मिळून मला रिहॅबिटेशन सेंटरमध्ये टाकले. तिथे माझ्यावर प्रचंड अत्याचार व्हायचे. काही वेळा तर मी रक्तबंबाळ व्हायचो. माझी शुद्धदेखील हरपायची. कसेतरी करून मी माझ्या मॅनेजरशी संपर्क केला आणि त्याने मला तिथून बाहेर काढले. घरी आल्यावर सगळे काही सुरळीत होईल असे मला वाटत होते. पण मी गोव्याला गेलो असताना मला उचलून पागलखान्यात दाखल करण्यात आले.