​रणवीरच्या जाहिरातीवर सिद्धार्थचे खरमरीत ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 11:57 AM2016-11-24T11:57:55+5:302016-11-24T11:57:55+5:30

साऊथ अ‍ॅक्टर सिद्धार्थ न केवळ त्याच्या गुड लुक्स आणि नितांत सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तर सामाजिक भान असलेला कलाकार ...

Siddhartha's tweet on Ranveer's advertisement | ​रणवीरच्या जाहिरातीवर सिद्धार्थचे खरमरीत ट्विट

​रणवीरच्या जाहिरातीवर सिद्धार्थचे खरमरीत ट्विट

googlenewsNext
ऊथ अ‍ॅक्टर सिद्धार्थ न केवळ त्याच्या गुड लुक्स आणि नितांत सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तर सामाजिक भान असलेला कलाकार म्हणूनही तो ओखळला जातो. चालू घडामोडींवर तो अधुनमधून टीका-टिप्पणी करीत असतो. यावेळी ‘बाजीराव’ रणवीर सिंगवर त्याच्या टीकेचा धनी होण्याची वेळ आली.

रणवीर करत असलेल्या एका जाहिरातीचे पोस्टर महिलांची प्रतिमा मलिन करणारे असून एकंदर पुरुषी वर्चस्व अधोरेखीत करणारे असल्याची टीका सिद्धार्थने केली आहे. मुंबईमध्ये लागलेल्या या जाहिरातीच्या होर्डिंगचा फोटो ट्विट करत त्याने लिहिले की, ‘कर्मचारी महिलांच्या अधिकारांना कशा प्रकारे पायदळी तुडवावे याचा वस्तूपाठ म्हणजे ही जाहिरात. लिंगभेदाची परिसीमा गाठणाऱ्या या जाहिरातीचा निषेध!’

पोस्टरमध्ये ‘आॅफिस काम (‘‘महिला’’) बिनधास्त घरी घेऊन जा’ अशा आशयाचे अपमानास्पद वाक्य असून रणवीर एका मुलीला खांद्यावर उचलून घरी घेऊन जाताना दिसतो. महिला कर्मचाऱ्यांना हिणवणाऱ्या या जाहिरातीमुळे रणवीर सिंगवर चोहीकडून टीका होत आहे. सोशल मीडियावर रणवीर आणि जाहिरातीची कंपनी दोघांवर लिंगभेद करत असल्याचे आरोप केले जात आहेत.

                                         

लोकप्रिय अभिनेता म्हणून रणवीरने थोडे तरी समाज भान बाळगावे. देशामध्ये आगोदरच महिला सुरक्षा धोक्यात असताना अशा प्रकारची चिथवणीखोर जाहिरात करून कोणता नवा आदर्श तो चाहत्यांसमोर ठेवत आहे? असा थेट सवाल नेटीझन्स विचारताहेत. त्याच्या ‘ओव्हर द टॉप’ आणि बिनधास्त स्वभावासाठी तो प्रसिद्ध आहे; परंतु यावेळी त्याने जरा हद्दच केली अशी प्रतिक्रिया सोशल मीडियवर उमटत आहेत.

मागच्या वर्षी आलेल्या महापुरात जेव्हा चेन्नईमध्ये हाहाकार माजला होता तेव्हादेखील सिद्धार्थ स्वत: लोकांच्या मदतीला प्रत्यक्ष धावून गेला होता. रणवीर, वेळीच समजुदारपणा दाखवत सिद्धार्थकडून दोन-चार गोष्टी शिकून घेता आल्या तर बघ. तुझ्याच फायद्याचे आहे!

Web Title: Siddhartha's tweet on Ranveer's advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.