RRR ला ऑस्कर मिळताच सिद्धार्थ मल्होत्राने केली खोचक कमेंट?; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:30 IST2023-03-14T16:29:52+5:302023-03-14T16:30:56+5:30
Sidharth Malhotra: त्याच्या या वागण्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

RRR ला ऑस्कर मिळताच सिद्धार्थ मल्होत्राने केली खोचक कमेंट?; म्हणाला...
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच सिद्धार्थने अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत (Kiara Advani) लग्नगाठ बांधली. त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. मात्र, सध्या सिद्धार्थ त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने ऑस्करमध्ये बाजी मारली. मात्र, याविषयी सिद्धार्थने खोचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे तो ट्रोल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 'इंस्टंट बॉलिवूड'ने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ एअरपोर्टवर असून त्याने पापाराझींकडे दुर्लक्ष करत RRR च्या विजयावर भाष्य करणं टाळलं आहे.
काय म्हणाला सिद्धार्थ?
सिद्धार्थला एअरपोर्टवर पाहिल्यानंतर छायाचित्रकार, पापाराझी यांनी त्याला गराडा घातला. सोबतच "ऑस्करमध्ये RRR आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स’ या दोघांना पुरस्कार मिळाला आहे. त्याविषयी काय वाटतं?", असा प्रश्न पत्रकारांनी सिद्धार्थला विचारला. त्यावर 'इथे काय प्रेस कॉन्फरन्स सुरु आहे का?' असा खोचक प्रश्न विचारला. इतकंच नाही तर सगळ्यांकडे दुर्लक्ष करत सिद्धार्थ तेथून निघून गेला.
दरम्यान, त्याच्या या वागण्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. तर, काहींनी त्याला पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं दिसून येतं. सिद्धार्थ लवकरच योद्धा या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे.