Sidharth Malhotra : “भावा, लग्नानंतर असंच होतं...”, सिद्धार्थ मल्होत्राची चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 10:32 AM2023-03-12T10:32:07+5:302023-03-12T10:34:19+5:30

Sidharth Malhotra : विमानतळावरचा सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्याची मजा घ्यायला सुरूवात केली.

sidharth malhotra forget to remove tag from jeans user trolled | Sidharth Malhotra : “भावा, लग्नानंतर असंच होतं...”, सिद्धार्थ मल्होत्राची चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी, नेमकं काय घडलं?

Sidharth Malhotra : “भावा, लग्नानंतर असंच होतं...”, सिद्धार्थ मल्होत्राची चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी, नेमकं काय घडलं?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) व कियारा अडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर आता दोघंही आपआपल्या कामावर पतरले आहेत. अलीकडे सिद्धार्थ मुंबई एअरपोर्टवर दिसला. यावेळी कियारा त्याच्यासोबत नव्हती. पण विमानतळावरचा सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्याची मजा घ्यायला सुरूवात केली.

व्हिडीओत सिद्धार्थ कारमधून उतरताना दिसतो. कारमधून उतरून विमानतळाच्या गेटच्या दिशेने जाऊ लागतो. विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी तो पापाराझींसमोर पोज देतो. याचवेळी तो मागे वळतो आणि त्याच्या पँटवरचा टॅग दिसतो. खरं तर हा प्राईज टॅग नसून ब्रँड डिझाईन आहे. पण युजर्सनी त्याला प्राईज टॅग समजून सिद्धार्थची मजा घ्यायला सुरूवात केलीये. युजर्सनी सिद्धार्थच्या या व्हिडीओवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

पक्का, बेगमला भेटून आलेला नाही, नाहीतर तिने सांगितलं असतं..., अशी कमेंट एका युजरने केली आहे. लग्नानंतर असंच होतं, अशी कमेंट अन्य एकाने केली.  भाई, कियारासारखी बायको असेल तर मी सगळं विसरून जाईन, अशी मजेशीर कमेंटही एका युजरने केली. कियारासारखी बायको असल्यावर कोणाला शुद्ध राहिल भीडू, अशी कमेंटही कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतेय. एका युजरने याला शादी के साइड इफेक्ट्स म्हटलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारी 2023 रोजी विवाहबद्ध झाले. दोघांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. अगदी शाही थाटात हे लग्न पार पडलं होतं.  लग्नानंतर सिड आणि कियाराने मुंबई आणि दिल्लीत त्यांच्या मित्रांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या रिसेप्शनला बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

Web Title: sidharth malhotra forget to remove tag from jeans user trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.