'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लूक; नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 04:53 PM2023-11-07T16:53:16+5:302023-11-07T17:03:09+5:30

'योद्धा' सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.

Sidharth Malhotra’s Yodha Gets New Release Date and Poster | 'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लूक; नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लूक; नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा 'योद्धा' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'योद्धा' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर देखील आऊट झालं आहे.  सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर 'योद्धा'चे दोन नवे पोस्टर शेअर केले. एका पोस्टमध्ये तो सैनिकाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्यात त्याचा अ‍ॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. त्याने लिहिले, 'अ‍ॅक्शन आणि रोमांचचा धमाका करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्हीदेखील सीट बेल्ट लावा, योद्धा 15 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल'.

शेरशाहनंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा ​'​योद्धा'मध्ये एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना दिसणार आहे. 
सिद्धार्थ मल्होत्रा-दिशा पटानी यांच्या 'योद्धा' चित्रपटाची रिलीज डेट आतापर्यंत चार वेळा बदलली आहे. यापूर्वी हा चित्रपट 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. 

अखेर योद्धा रिलीज करण्यासाठी 15 डिसेंबरची निवड करण्यात आली होती. पण याच दिवशी धनुष त्याचा 'कॅप्टन मिलर' चित्रपटही प्रदर्शित करत आहे. त्यानंतर निर्मात्यांनी 'योद्धा' 8 डिसेंबर 2023 रोजी रिलीज करण्याची योजना आखली. मात्र, याच दिवशी कतरिना कैफचा 'मेरी ख्रिसमस' प्रदर्शित होत आहे. या सगळ्यानंतर आता अखेर 'योद्धा'ला रिलीजची नवी तारीख मिळाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि दिशा पटानी यांचा हा चित्रपट आता 15 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Sidharth Malhotra’s Yodha Gets New Release Date and Poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.