‘ट्यूबलाईट’चे शूटींग लांबण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 02:48 PM2016-09-11T14:48:44+5:302016-09-11T20:18:44+5:30
सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाचे शूटींग शेड्यूल संकटात सापडले आहे. लडाखमधील पहिले शूटींग शेड्यूल सलमानने वेळेआधीच पूर्ण केले होते. ...
स मान खानच्या ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाचे शूटींग शेड्यूल संकटात सापडले आहे. लडाखमधील पहिले शूटींग शेड्यूल सलमानने वेळेआधीच पूर्ण केले होते. यानंतर मनालीत या चित्रपटाच्या दुसºया टप्प्याचे शूटींग सुरु आहे. पण मनालीतील शूटींग शेड्यूल लांबण्याची चिन्हे आहेत. होय, खुद्द ‘ट्यूबलाईट’ चे दिग्दर्शक कबीर खान यांनी टिष्ट्वटरवर याचे संकेत दिले आहेत. खराब हवामानामुळे ‘ट्यूबलाईट’चे शूटींग रखडले आहे. एका शॉटसाठी १२ हजार फूट उंच पहाडावर सेट उभारण्यात आला होता. मात्र खराब हवामान व अपुरा प्रकाश यामुळे याठिकाणचे शूटींग होऊ शकले नाही. चित्रपटाच्या अख्ख्या युनिटला याठिकाणी काम करणे कठीण जात आहे. यामुळेच ‘ट्यूबलाईट’चे शूटींग लांबण्याची चिन्हे आहेत. आता कबीर खान यातून काय मार्ग काढतात, ते बघूच!!
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}We built a set 12000 feet high in the mountains. But when we went to shoot this is what happened #Living in clouds pic.twitter.com/kFeyjG8mNz— Kabir Khan (@kabirkhankk) September 11, 2016