Sikandar Movie: सलमानच्या गाण्यावर थिएटरमध्येच चाहते नाचायले लागले अन्...; लंडनमधील व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 09:52 IST2025-03-30T09:51:50+5:302025-03-30T09:52:09+5:30
सलमानच्या या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'सिकंदर'च्या स्क्रिनिंग दरम्यानचे थिएटरमधील काही व्हिडिओही समोर आले आहेत.

Sikandar Movie: सलमानच्या गाण्यावर थिएटरमध्येच चाहते नाचायले लागले अन्...; लंडनमधील व्हिडिओ समोर
ज्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा आज अखेर प्रदर्शित झाला. ईदच्या मुहुर्तावर भाईजानने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 'सिकंदर' थिएटरमध्ये प्रदर्शित होताच सगळे शो हाऊसफूल झाले आहेत. सलमानच्या या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'सिकंदर'च्या स्क्रिनिंग दरम्यानचे थिएटरमधील काही व्हिडिओही समोर आले आहेत.
सगळीकडे फक्त सलमानच्या 'सिकंदर'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही सलमानच्या 'सिकंदर'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. लंडनमधील 'सिकंदर'च्या स्क्रिनिंगचा थिएटरमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सिनेमातलं बम बम भोले हे गाणं लागताच चाहत्यांनी थिएटरमध्येच नाचायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. थिएटरमधील स्क्रिनजवळ चाहते नाचत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
Just watched #Sikandar in London, and it was an incredible film and experience!! @BeingSalmanKhan delivers a magnificent performance, supported by excellent BGM, imagery and plot! Excellent cast, including @iamRashmika! Whole cinema was bouncing #SikandarReview#SalmanKhan𓃵pic.twitter.com/G9GQMoeeaf
— SD (@ShahidDharamsi) March 30, 2025
'सिकंदर'मध्ये सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर २०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाची सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे. पहिल्या दिवशी सलमानचा सिनेमा ६० कोटींचं कलेक्शन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.