"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:20 IST2025-03-28T10:17:04+5:302025-03-28T10:20:37+5:30

'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाने मनातली भीती व्यक्त केली. काय आहे यामागचं कारण (sikandar, rashmika mandanna)

sikandar movie rashmika mandanna in stress while movie released in eid salman khan | "मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली-

"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली-

सलमान खानच्या (salman khan) आगामी 'सिकंदर' (sikandar) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. दोन दिवसांमध्ये 'सिकंदर' सिनेमा जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'सिकंदर' सिनेमात सलमान खानसोबतरश्मिका मंदाना (rashmika mandanna) प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अशातच 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिकाने मोठं वक्तव्य केलंय ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली रश्मिका? जाणून घ्या

'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका काय म्हणाली

'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका म्हणाली की, "याआधी माझ्या कोणत्याही सिनेमाच्या रिलीजपूर्वी मी इतकी टेंशनमध्ये नव्हते. पण यावेळी जरा टेंशन आहे. ही सलमान खानची फिल्म आहे आणि हा सिनेमा ईदला रिलीज होणार आहे. इतक्या मोठ्या सिनेमाला प्रेक्षक कसे स्वीकारतात आणि प्रेक्षकांना माझा अभिनय आवडतो का, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे." अशाप्रकारे रश्मिका मंदानाने 'सिकंदर'च्या रिलीजआधी ती किती टेंशनमध्ये आहे, याचा खुलासा सर्वांसमोर केलाय. 

'सिकंदर' ईदला होतोय रिलीज

सलमान खानचा बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमा ईदला रिलीज होणार आहे. ३० मार्च रविवारी हा सिनेमा जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खान या सिनेमात कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'सिकंदर'मध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदान, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सत्यराज हे कलाकार दिसणार आहे. 'सिकंदर'चं दिग्दर्शन ए. आर. मुरुगोदास यांनी केलंय.

Web Title: sikandar movie rashmika mandanna in stress while movie released in eid salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.