सलमान खान त्याचे चित्रपट ईदलाच का रिलीज करतो? कधीपासून सुरू केला हा ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 11:22 IST2025-03-30T11:20:13+5:302025-03-30T11:22:46+5:30
सलमानने ईदला सिनेमा रिलीज करायला कधीपासून सुरूवात केली?

सलमान खान त्याचे चित्रपट ईदलाच का रिलीज करतो? कधीपासून सुरू केला हा ट्रेंड
Sikandar: ईद आणि सलमान खानचा चित्रपट हे एक समीकरणच आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमानचे चित्रपट ईदला प्रदर्शित होतात. ईद येताच सलमान खानचे चाहते थिएटरमध्ये त्याच्या चित्रपटांची वाट पाहू लागतात. यंदाही बहुप्रतिक्षित 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या (Eid 2025) निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ईदच्या एक दिवस आधी रविवारी चित्रपट प्रदर्शित करून सलमानने चौकार ठोकला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होईल अशी अपेक्षा आहे. पण, सलमानने ईदला सिनेमा रिलीज करायला कधीपासून सुरूवात केली? हे माहितेय का? तर याबद्दल जाणून घ्या.
गेल्या दीड दशकापासून सलमान खानचे चित्रपट ईदच्या दिवशी थिएटरमध्ये वर्चस्व गाजवत आहेत आणि इतिहास याचा साक्षीदार आहे. सलमान खानने ईदला चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड १६ वर्षांपूर्वी सुरू केला होता. २००९ मध्ये 'वॉन्टेड' हा चित्रपट त्याने ईदला प्रदर्शित केला होता. त्यावेळी सलमानचं करिअर डळमळीत होतं. जवळपास आठ-नऊ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर 'वॉन्टेड' हिट झाला होता. त्यामुळे ईद आपल्यासाठी लकी आहे, असा विचार करत सलमाननं ईदला चित्रपट प्रदर्शित करायला सुरूवात केली होती.
'वॉन्टेड' सिनेमानंतर सलमानच्या करिअरनं एक वेगळं वळण घेतलं. यानंतर सलमाने ईदला दबंग चित्रपट प्रदर्शित केला. यानंतर सलमानची पडद्यावरची सोज्वळ, लव्हरबॉय 'प्रेम' ही प्रतिमा बदलत 'दबंग' अशी बदलत गेली. 'दबंग' सलमानचे ईदला बॉडीगार्ड, एक था टायगर, किक, बजरंगी भाईजान, सुलतान, ट्यूबलाईट, रेस ३, भारत, राधे, अंतीम आणि किसी का भाई किसी की जान हे चित्रपट प्रदर्शित झालेत. 'मैनें प्यार किया'पासून सलमानची कारकीर्द सुरू झाली. त्याने अनेक हिट चित्रपट दिलेत. आता 'सिकंदर' किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.