विकी कौशलसोबतच्या ब्रेकअपवर हरलीन सेठीने सोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 05:16 PM2019-04-30T17:16:52+5:302019-04-30T17:17:48+5:30
उरी फेम अभिनेता विकी कौशलचे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाले.
उरी फेम अभिनेता विकी कौशलचे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाले. आधी त्यांच्या अफेयरची आणि नंतर त्यांच्या ब्रेकअपची खूप चर्चा झाली. नुकतेच हरलीने ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे. ती म्हणाली की, जे काही झाले ते चांगलेच झाले.
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, हरलीनने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तिने विकी कौशलसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले आहे.
हरलीन म्हणाली की, खरे सांगू मला या गोष्टीचा अजिबात त्रास झाला नाही. मात्र माझे कुटुंब व मित्रांना खूप त्रास झाला. प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख असते. या गोष्टीमुळे मी स्वत:ला कमी लेखत नाही आहे. मी एका स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि मी आतापर्यंत एकही सिनेमा केलेला नाही यामुळे मी अजिबात स्वत:ला कमी लेखत नाही. मी स्वत:वर प्रेम करते. मला लोकांनी हरलीन सेठी म्हणूनच ओळखावे. त्यामुळे एखाद्याला माझा एक्स बॉयफ्रेंड म्हणणे चुकीचे ठरेल.
तर काही दिवसांपूर्वी अभिनेता विकी कौशलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सिंगल आहे. एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की तो सिंगल आहे का? यावर तो म्हणाला, हो मी सिंगल आहे. ब्रेकअप होण्याआधी विकीने अनेक मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपबाबत खुलेपणाने चर्चा केली होती. त्याने कॉफी विथ करणमध्येही रिलेशनशीपबद्दल सांगितले होते.
विकीच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या तो सरदार उधम सिंग या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून त्याला सेट पीटर्सबर्ग येथे नुकतेच या चित्रपटाच्या लूकमध्ये पाहाण्यात आले. विकीची या चित्रपटातील हेअरस्टाईल खूप वेगळी असून त्याच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला एक व्रण दिसून येत आहे. विकीनेच त्याचा या चित्रपटाचा लूक इन्स्टाग्रामला शेअर केला आहे.
तर हरलीन सेठी काही महिन्यांपूर्वी वेब सीरिज ब्रोकन अँड ब्युटिफूलमध्ये दिसली होती. यातील तिच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते.