simba box office collection : सिम्बा या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 10:59 AM2018-12-29T10:59:52+5:302018-12-29T12:05:20+5:30
सिम्बा या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई केली आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर रणवीरचा पहिलाच चित्रपट सिम्बा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई केली आहे.
सिम्बा या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 15 कोटीहून अधिक गल्ला जमवला असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाने 18 कोटीहून अधिक कमाई केली असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक गिरिश जोहर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वर्तवला आहे.
एवढेच नव्हे तर हा चित्रपट भारताबाहेर देखील चांगला व्यवसाय करत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सिम्बा हा चित्रपट मसाला मुव्ही असल्याने हा चित्रपट भारताबाहेर चांगला व्यवसाय करणार नाही असे अनेकांचे मत होते. पण चांगले काय आहे हे प्रेक्षक जाणून असतो आणि सिम्बाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 88.58 लाख रुपये कमाई केली आहे. हिंदी चित्रपटाची ऑस्ट्रेलियातील ही खूप चांगली कमाई आहे.
A section of the industry was of the opinion that #Simmba wouldn’t rake in big numbers Overseas, due to the masala quotient... But the audience knows best... #Simmba embarks on one of the best starts in #Australia... Fri A$ 180,253 [₹ 88.58 lakhs]. @comScore
— taran adarsh (@taran_adarsh) December 29, 2018
सिम्बा या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान आणि सोनू सूद यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच सिद्धार्थ जाधव, वैदही परशुराम, विजय पाटकर, अरुण नलावडे, नंदू माधव, सौरभ गोखले यांसारख्या अनेक मराठी अभिनेत्यांनी देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत केली गेली असून ‘सिम्बा’ हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीच्या भूमिकेला तितकेसे महत्व नव्हते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. ‘सिम्बा’ या सिनेमात रणवीर पहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमातील ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’चे रिमिक्स व्हर्जन लोकांनी डोक्यावर घेतले आहे.